ETV Bharat / city

Cricket match in Nagpur : पावसाचा फटका; ऑस्ट्रेलियासह भारतीय क्रिकेट संघाचा नागपूरमधील सराव सत्र रद्द - Cricket

नागपुरात शुक्रवारी होणार्‍या भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यावर पावसाचे सावट (Due to rain cricket team practice session) आहे. आज सकाळपासून नागपुर आणि आजूबाजूच्या भागात सुरू झालेल्या पावसामुळे ऑस्ट्रेलियन आणि भारतीय दोन्ही संघांनी क्रिकेट सराव सत्र रद्द केले (Australian cricket team canceled practice session) आहे.

Due to rain  Australian cricket team canceled practice session
पावसामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने सराव सत्र केलं रद्द
author img

By

Published : Sep 22, 2022, 2:37 PM IST

Updated : Sep 22, 2022, 4:00 PM IST

नागपूर : नागपुरात शुक्रवारी होणार्‍या भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यावर पावसाचे सावट (Due to rain cricket team practice session) आहे. आज सकाळपासून नागपुर आणि आजूबाजूच्या भागात सुरू झालेल्या पावसामुळे ऑस्ट्रेलियन आणि भारतीय दोन्ही संघांनी क्रिकेट सराव सत्र रद्द केले (Australian cricket team canceled practice session) आहे.

पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ जमठाच्या मैदानात सराव करणार होता. मात्र, पावसाची रिपरिप सुरू असल्याने ऑस्ट्रेलियन आणि भारतीय दोन्ही संघांनी सराव सत्र रद्द केले आहे. आता कांगारू संघ उद्या थेट मैदानात उतरणार आहे. आज दुपारच्या भारतीय संघाचे सरावाचे वेळापत्रक आहे. तेही पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. नागपुरातील व्हीसीए मैदानावर मुख्य मैदानात क्षेत्ररक्षणाचा सराव होतो,तर फलंदाजीसाठी इनडोअर व्यवस्था आहे मात्र ऑस्ट्रेलिया संघाने कोणताही प्रकारचा सराव केला

( cricket team canceled practice session) नाही.

पावसाची रिपरिपमुळे सराव सत्र रद्द - व्हीसीएच्या स्टेडियमवर तब्बल तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. मात्र, हवामान विभागाने शुक्रवारी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास क्रिकेट शौकिनांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता (Rain forecast in Vidarbha for next few days) आहे.

जामठ्याची 'ड्रेनेज सिस्टीम' उत्तम - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे विदर्भात २१ सप्टेंबर ते २३ दरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जमठा स्टेडियमची 'ड्रेनेज सिस्टीम' उत्तम आहे. त्यामुळे थोडाफार पाऊस आल्यास फार फरक पडणार नाही.

Last Updated : Sep 22, 2022, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.