ETV Bharat / city

मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवले, रश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल - मद्यधुंद

रात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान रस्तावर तुरळक गर्दी होती. यादरम्यान लक्ष्मी नगरच्या ८ रस्ता चौकाकडून येणाऱ्या भरधाव कारने एका मागे एक दुचाकी उडवायला सुरुवात केली.

अपघातग्रस्त कार
author img

By

Published : May 11, 2019, 5:16 PM IST

नागपूर - शहराच्या बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री भरधाव कारने तिघांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत ३ विद्यार्थ्यांसह कार चालक गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताबद्दलची माहिती

रात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान रस्तावर तुरळक गर्दी होती. यादरम्यान लक्ष्मी नगरच्या ८ रस्ता चौकाकडून येणाऱ्या भरधाव कारने एका मागे एक दुचाकी उडवायला सुरुवात केली. त्यानंतर, मद्यधुंद कारचालकाने कार दुभाजकावर आदळवली. या अपघातात ईशान कुरेशी, संतोष अग्रवाल आणि महादेवन हे ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले.तर, कारचालक के. रवींद्र राव (वय ५५) जखमी झाले आहेत.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमींना उपचारासाठी रवाना केले आणि आरोपी कार चालक के. रवींद्र राव यांच्याविरुद्ध रश ड्रायव्हिंगचा गुन्हा नोंदवला. के. रवींद्र राव एका महाविद्यालयात प्राचार्यपदी कार्यरत असून अपघाताच्या वेळी त्यांनी दारू प्यायली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Intro:नागपूर शहराच्या बजाज नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री भरधाव कारने तिघांना उडवल्याची घटना1घडली आहे....या अपघातात तीन विद्यार्थ्यांसह कार चालक देखील गंभीर जखमी झाला असून त्या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Body:वेळ साधारणतः रात्री बारा ते एक च्या दरम्यानची होती...रस्तावर अगदी तुरळक रहदारी होती....त्याच वेळी लक्ष्मी नगरच्या आठ रस्ता चौकाकडून येणाऱ्या धारधाव कारणे एका मागे एक दुचाकी उडवायला सुरवात केली.... त्यानंतर मद्यधुंद कारचालक स्वतःची कार घेऊन पुढे जात असताना ही कार देखील दुभाजकावर आदळली या भीषण अपघातात ईशान कुरेशी संतोष अग्रवाल महादेवन हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत तर के रवींद्र राव हे 55 वर्षीय संचालक सुद्धा जखमी झाले आहेत बजाज नगर पोलिसांनी घटनेची माहिती समजताच घटनास्थळ गाठून जखमींना मेडिकल येथे उपचाराकरिता रवाना करून आरोपी कार चालक के रवींद्र राव यांच्याविरुद्ध रश ड्रायव्हिंग चा गुन्हा नोंदवला आहे.... आरोपी के रवींद्र राव हे त्याच परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात प्राचार्यपदी कार्यरत असून अपघाताच्या वेळी त्यांनी दारू प्यायली असल्याची माहिती पोलिसांनी दिली

WKT

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.