ETV Bharat / city

महापरिनिर्वाण दिन : दीक्षाभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंची गर्दी दीक्षाभूमीवर उसळत असते. परंतु यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच अनुयायींच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. चैत्यभूमी प्रमाणेच दीक्षाभूमीला अनुयायींची गर्दी असते. महाराष्ट्रच नाही तर इतरही राज्यातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. परंतु यंदा काही ठराविक लोकांनाच परवागी देण्यात आली आहे.

author img

By

Published : Dec 6, 2020, 1:48 PM IST

नागपूर महापरिनिर्वाण दिन न्यूज
नागपूर महापरिनिर्वाण दिन न्यूज

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत ६ डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादनासाठी येत असतात. नागपूरातही दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादनासाठी अनुयायी येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्याच अनुयायींच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. शिवाय, आपल्या घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करा. असे आवाहन बाबासाहेब स्मारक समितीकडून करण्यात आले आहे.

नागपूर महापरिनिर्वाण दिन न्यूज
नागपूर महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
दीक्षाभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

कोरोनामुळे यंदा मोजकीच गर्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंची गर्दी दीक्षाभूमीवर उसळत असते. परंतु, यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच अनुयायींच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. चैत्यभूमी प्रमाणेच दीक्षाभूमीला अनुयायींची गर्दी असते. महाराष्ट्रच नाही तर, इतरही राज्यातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. परंतु यंदा काही ठराविक लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा - महापरिनिर्वाण दिन विशेष : नव्या पिढीनं शिकून मोठं व्हावं - कडूबाई खरात यांचं आवाहन

कोरोना नियमांचे पालन करत प्रवेश

शिवाय दीक्षाभूमीवर प्रवेश करतांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील प्रशासन व बाबासाहेब स्मारक समितीकडून करण्यात येत आहे. असे असले तरी कोरोना नियमांचे पालन करत अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होत आहेत. शिवाय दीक्षाभूमीवर आल्याने नवचैतन्य मिळते, अशी भावनाही अनुयायांनी व्यक्त केली आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक अनुयायींना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अभिवादनासाठी येणारा प्रत्येक अनुयायी नियमांचे पालन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पंचशील ध्वज झळाळले

तसेच, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दीक्षाभूमीवर पंचशील ध्वज लावण्यात आले आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवर चैतन्य निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. शिवाय अधिक गर्दी होवू नये, म्हणून फक्त दोनच प्रवेशव्दारे खुली करण्यात आली आहेत. दरवर्षी दीक्षाभूमीवर गर्दी उसळत असली तरी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र मोजकेच लोक येथे आले आहेत.

हेही वाचा - धक्कादायक! दिवाळीत आणललेल्या कार्बाईड गनमुळे शेकडो लोकांच्या डोळ्यांना इजा; काहीजणांना अंधत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.