ETV Bharat / city

Nagpur Collector appealed : गरज नसल्यास घराबाहेर पडू नका; सतर्क रहा, नागपूर जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन - Nagpur Collector

नांदा गोमुख येथील दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी शोक व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व जलसाठे व त्यातील विसर्ग याची माहिती नदीकाठच्या गावांना ( villages ) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सतर्क रहा, जिल्हाधिकारी आर. विमला यांचे आवाहन

जिल्हाधिकारी आर. विमला यांचे आवाहन
जिल्हाधिकारी आर. विमला यांचे आवाहन
author img

By

Published : Jul 14, 2022, 9:03 AM IST

नागपूर - नागपूर जिल्ह्यामध्ये ( Nagpur District ) सततधार पावसाने ( Rain ) सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढलेला आहे. 18 धरणातून ( dam ) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता नसेल, तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने ( Appeal of district administration )केले आहे. मागील 2 दिवसात 10 जण वाहून गेल्याने मृत्युमुखी पडले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनीही परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती जिल्हाधिकरी आर. विमला यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला - मंगळवारी झालेल्या नांदा गोमुख येथील दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी शोक व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व जलसाठे व त्यातील विसर्ग याची माहिती नदीकाठच्या गावांना ( villages ) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात पुढील 2 पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.

3 प्रकल्प 100 टक्के भरले - नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 91.90 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 12 जुलै पर्यंत जवळपास 357 मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात कोसळला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 13 मध्यम धरणे 65 टक्के भरले आहे. यापैकी 3 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक नसेल, तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

विविध घटनेत सुमारे 10 जणांचा मृत्यू - सावनेर तालुक्यातील नांदा गोमुख 6 जण वाहून गेले, असून 5 जणांचे मृतदेह मिळून आले. तेच सावनेर तालुक्यातीलच पटाका खेरी नालावरून एक जण वाहून गेला आहे. नागपूर शहरातील मानकापूरच्या साईनगर नाल्यांमध्ये 33 वर्षीय योगेश राऊत वाहून गेले. याशिवाय काटोल तालुक्यातील इसापूर येथील चिखली तलावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काटोल तालुक्यातील मौजा पेठ बुधवार या ठिकाणी दत्तू मधुकर राजूरकर या 39 वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याची नोंद आहे. विविध घटनेत सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला - यात पावसाचा कहर अजून संपला नसून, 3 दिवस आणखी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळेच प्रशासनाने घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत या पावसामुळे एक जून पासून 13 जुलै पर्यंत विविध घटनेत 20 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहेत. 19 जण जखमी झाले असून 88 पशु दगावले आहे. सतत पडणाऱ्या पावसाने सुमारे 93 घरांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे या महिन्याभरात 2 हजार 399 हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. याच परिस्थितीचा आढावा घेत सतर्कतेचा इशारा दिला आहेत.

हेही वाचा - Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळित, शाळांना सुट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.