नागपूर - मनासारखा पगार मिळत नाही, कामाचे समाधान नाही, यासारख्या अनेक कारणांनी कुणी राजीनामा दिल्याचे अनेकदा आपण ऐकल असेल. परंतु नागपुरात एका वकीलाने न्यायालयातील कॅन्टीनमध्ये समोसा महाग मिळतो, या कारणामुळे जिल्हा बार असोसिएशनच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याचा प्रकार घडला आहे. नागपूर जिल्हा बार असोसिएशन (डीबीए) कडून संचालित करण्यात येत असलेल्या कॅन्टीनमध्येच समोसा महाग झाल्याने वकिलाने निषेध नोंदवण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अॅड. धर्मराज बोगाटी असे राजीनामा देणाऱ्या वकीलाचे नाव आहे.
खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. हॉटेलचे खाद्य पदार्थ सुद्धा महागले आहेत. या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांसह वकीलांनाही बसला आहे. वकील धर्मराज बोगाटी जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. न्यायालयाच्या परिसरात बार असोसिएशनकडून कॅन्टीन चालवली जाते. कॅन्टीनमध्ये वकीलांना आणि असोसिएशनच्या सदस्यांना सवलतीच्या दरात समोसा आणि इतर खाद्यपदार्थ मिळावे, अशी आग्रही भूमिका वकील धर्मराज बोगाटी यांनी घेतली होती. मात्र खाद्य पदार्थांचे दर कमी करण्याऐवजी समोशाचे दर वाढवण्यात आल्याने नाराज झालेल्या धर्मराज बोगाटी यांनी जिल्हा बार असोसिएशनच्या सदस्य पदाचा राजीनामा दिली आहे.
'माफक दरात खाद्यपदार्थ मिळणे हा वकीलांचा अधिकार' : हायकोर्ट बार असोसिएशनच्या कॅन्टीनमध्ये जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या कॅन्टीनमध्ये खाद्य पदार्थांचे माफक दरात मिळणे अपेक्षित आहे. असे असताना सुद्धा समोशाचे दर वाढवण्यात आल्याचा आरोप अॅड. धर्मराज बोगटी यांनी केला आहे.
हेही वाचा - Dispute Over Nanar Project : नाणार प्रकल्प बारसू येथे करावा, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र