ETV Bharat / city

Devendra Fadnavis On Shinde Shivsena : एकनाथ शिंदेची शिवसेना वैचारिक, उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार- देवेंद्र फडणवीस - Fadanvis On Shindes Shivsena

बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा हा एकनाथ शिंदेंकडे ( Eknath Shinde ) आहे. तर उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव असल्याने ठाकरे घराण्याचा कौटुंबिक वारसा निश्चित त्यांच्याकडे जातो. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही वैचारिक शिवसेना आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज प्रथमच ते नागपूरमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींवर संवाद साधला.

Devendra Fadanvis Press Meet
Devendra Fadanvis Press Meet
author img

By

Published : Jul 5, 2022, 9:10 PM IST

नागपूर - गेली अडीच वर्षे मी मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याचं दुःख नव्हतं तर महाराष्ट्र विकासाच्या प्रत्येक क्षेत्रांत मघरला असल्याची वाईट वाटतं असे वक्तव्य केलं आहे राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी. ते आज नागपूर प्रेस क्लब तर्फे आयोजित मीट द प्रेस मध्ये बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने या अडीच वर्षात विदर्भ आणि मराठवाडावर सर्वाधिक अन्याय केला आहे. विकासाचे सर्व महत्वाचे प्रकल्प गुंडाळून महाविकास आघाडी सरकारने एकप्रकारे दडपशाहीचे धोरण अवलंबले होते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आली तेव्हापासून शिवसेनेच्या मंत्र्यांसह आमदारांमध्ये खदखद होती, मी केवळ ती ओळखून योग्य वेळी योग्य पावले उचलली असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना हा पक्ष कुणाचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना ( Eknath Shinde ) ही बाळासाहेबांची वैचारिक वारसदार आहे तर उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार असल्याचा टोला त्यांनी लावला आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वैचारिक वारसा एकनाथ शिंदेंकडे - फडणवीस

अडीच वर्षे सक्षम विरोधी पक्षनेता - मी अडीच वर्ष सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेला आहे. या काळात राज्यभरातील रुग्णालये आणि विलगीकरण केंद्रामध्ये फिरलो. ज्यावेळी मला कोरोना झाला त्यावेळी कुठल्याही खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याऐवजी शासकीय रुग्णालयात जाऊन स्वतःवर उपचार करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर लगेचच खदखद दिसत होती - शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची साथ सोडून नैसर्गिक युती तोडली. शिवसेनेने त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत अनैसर्गिक युती केल्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक मंत्री आणि आमदारांमध्ये खदखद दिसायला लागली होती. शिवसेनेच्या जोरावर महाविकास आघाडीतील इतर पक्ष कसे मोठे होत आहेत हे सेनेचे नेते उघड्या डोळ्यांनी बघत होते. म्हणूनच सेनेत उठाव झाला. याला बंड म्हणता येणार नाही आणि आम्ही त्या उठावाला साथ दिली असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मीच दिला - आम्ही ठरवले असते तर आम्हाला मुख्यमंत्रीपद हे मिळवता आले असते, पण आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. म्हणून आमच्या पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. हा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना मीच दिल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

एकनाथ शिंदेंना साथ देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे जुने सहकारी आहेत. त्यांच्यासोबत आम्ही यशस्वीरित्या सरकार चालवू. मी त्यामध्ये सर्वाधिक योगदान देईल आणि महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर येईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एवढेच नाही तर मराठवाडा आणि विदर्भ सारख्या मागास भागासाठी आम्ही विशेष लक्ष देऊन काम करणार, असे देखील ते म्हणाले आहेत.

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार - कालच आम्ही विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकलेला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात तर मी नागपूरला जनतेचे आभार मानण्याकरिता आलेलो आहोत. लवकरच आम्ही एकत्र बसून मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा करू आणि त्याप्रमाणे खातेवाटप देखील करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

राज ठाकरेंचे पत्र प्रेरणादायी - मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला लिहिलेले पत्र हे खरंच प्रेरणादायी आहे. त्यांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न मी सलग दोन दिवस केला. मात्र, माझ्याकडे शब्द अपुरे पडले. मी लवकरच राज ठाकरे यांची भेट घेणार असून त्यांचे आभार मानणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेची शिवसेना वैचारिक - बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कौटुंबिक वारसा आहे. मात्र, बाळासाहेबांचा खरा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे निघाले आहेत. भविष्यात काय होईल हे मी सांगू शकत नाही आणि शिवसेनेचे चिन्ह कोणाला मिळेल याबद्दल देखील स्पष्ट बोलू शकत नाही. मात्र, वैचारिक वारसा हा महत्त्वाचा असतो, असे फडणवीस म्हणाले आहेत.

संजय राऊतांवर प्रहार - महाराष्ट्राचे राजकारण एका व्यक्तीने कलुषित केलेले आहे. मला त्या व्यक्तीचे नाव घेण्याची गरज नाही. त्या व्यक्तीने महाराष्ट्राचे राजकारण अक्षरशः खड्ड्यात टाकलेले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने आता आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.