नागपूर - डॉक्टर्स लक्ष ठेऊन आहेत प्रयत्नांची शर्थ सुरू असून डॉक्टरांशी चर्चा केली आहे. सरकारला सांगणे आहे की आम्ही पूर्ण मदत करू. मी कुटुंबाला ही भेटलो, त्यांनी कडक शिक्षा व्हावी, अशी भावना व्यक्त केली आहे. फास्ट ट्रेक कोर्टात केस चालली पाहिजे. अशा नराधमाला फाशीची शिक्षा ही कमी आहे. लवकर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करू, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. हिंगणघाट पीडित महिलेची भेट घेण्या करता ते ऑरेंज सिटी रुग्णालयात आले होते.
हा राजकारणाचा विषय नाही, महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. महिला सुरक्षा संवेदनशील विषय आहे. आशा घटनांमध्ये पोलिसी आणि त्यापुढची कारवाई वेगाने झाली पाहिजे. आरोपीना कायद्याची भीती नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत. सरकारने यात लक्ष घालणे गरजेचे आहे. घृणास्पद हिंसेच्या घटनांत कारवाई झालीच पाहिजे. आम्ही देखील त्यात सहकार्य करू, असे देखील फडणवीस म्हणाले.