ETV Bharat / city

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीतील बदल संविधानाला धरून नाहीत - देवेंद्र फडणवीस

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकी ( Assembly Speaker Election )संदर्भात आज नागपूर येथील विमानतळावर फडणवीसांनी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी बूस्टर डोस ( Booster dose decision ) बाबतच्या निर्णयाबद्दल पंतप्रधानाचे आभार मानले.

देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
author img

By

Published : Dec 26, 2021, 5:32 PM IST

नागपूर - विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपालांकडे (The governor has the power to make decisions ) आहेत. त्यामुळे तो निर्णय राज्यपाल घेतील. पण अध्यक्षपदाच्या निवडीतील बदल संविधानाला धरून नसल्याने आक्षेप घेतल्याचे राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) नागपुरात म्हणाले. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. आम्ही आक्षेप घेतला होता. कारण आवाजी मतदानाने अध्यक्ष निवडीचा जो बदल केला तो बदल संविधानाच्या कलमाशी सुसंगत वाटत नाही. अशा पद्धतीने सर्व अधिकार काढून कायदेमंडळाचा कामापेक्षा कार्यकारी मंडळाच्या कामाला अधिक महत्व द्यायचे हे योग्य नाही. त्यामुळे याचा विरोध केल्याचे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - Nagpur Weather Update : नागपूरच्या तापमानात आजही घसरण, सात जिल्ह्यांचे तापमान १० डिग्रीखाली

अधिवेशन अगोदरच गुंडाळलेले आहे -

पाच दिवसाचे अधिवेशन घेऊन आणखी काय गुंडाळणार आहेत, असे म्हणत महाविकास आघाडीवर फडणवीस यांनी जोरदार टीका ( Fadnavis strongly criticizes Mahavikas Aghadi ) केली. पाच दिवसाचे अधिवेशन ठेवून पहिल्याच दिवशी अधिवेशन गुंडाळले आहे. यात तीन दिवस झाले असून आणखी दोन दिवस अधिवेशन बाकी आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या लशीच्या घोषणेने ओमायक्रॉन संकटाला तोंड देण्यास मदत होईल -

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी अटल बिहारी वाजपेयी ( Atal Bihari Vajpayee ) यांच्या जन्मदिनी सुशासन दिनी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना बूस्टर डोस देण्याचे जाहीर केले. तसेच 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना लस देण्याच्या घोषणेमुळे याचा फायदा ओमायक्रॉनमुळे आलेल्या संकटाला तोंड देण्यास मदत होईल, त्यासाठी त्यांचा आभारी असल्याचे देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.