नागपूर - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. यासंदर्भात राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात बोलताना मला याबाबत कल्पना नाही, सीबीआय असो किंवा ईडी या एजन्सी त्यांच्या परीने काम करतात. त्यांनाच विचारा, असे ते म्हणाले.
'कुण्या एका व्यक्तीचा प्रश्न नाही, तर कायद्याचा प्रश्न' -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळाल्याचे पत्र सकाळपासून व्हायरल होत आहे. यासंदर्भातही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. 'अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सीबीआयने स्पष्टीकरण दिलेले आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या नावाने ते पत्र व्हायरल झाले आहे, त्याच व्यक्तीच्या सहीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाली होती. सीबीआयने एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे. यामुळे जेव्हा सीबीआयने या प्रकरणात एफआयआर केली. तेव्हा एफआय रद्द करण्यासाठी हे प्रकरण हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात गेले. तरी त्यामध्ये कोर्टाच्या स्क्रूटनीनंतर अनिल देशमुख यांना यश मिळाले नाही. म्हणजेच एफआयआर रद्द झाली नाही. यामुळे अशा बातम्यांमधून कोणाचाही फायदा होणार नाही. हा कुण्या एका व्यक्तीचा प्रश्न नाही. तर हा कायद्याचा प्रश्न आहे. जे काही कायद्याने होईल, ते कायद्याने होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा - परिवहन मंत्री अनिल परबांना ईडीची नोटीस; संजय राऊत म्हणाले- क्रोनोलॉजी समजून घ्या...