नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली शिष्टाई कामी आली आहे. सात दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन संघटनेच्या वतीने अनुसूचित जातीच्या शासकीय अधिसंख्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषणावर (Organization for rights of human hunger strike) आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट उपोषणाच्या मंडपात पोहचले आणि उपोषणकर्त्याना मागण्या मान्य करण्याच्या संदर्भात सकारात्मक असल्याचे आश्वासन (Devendra Fadnavis politeness worked) दिले. त्यानंतर आंदोलकांनी आपले उपोषण मागे घेतले (hunger strike called off by Organization) आहे.
बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण मंडपाला भेट दिल्यानंतर सर्व मागण्यांची माहिती जाणून घेतली. तुमच्या प्रश्नांसाठी मी लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईत बैठक लावतो आणि तुमचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणकर्त्याना दिले.
उपोषण मागे घ्यावे - नागपूरचं उपोषण आपण मागे घेतले आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये सुरू असलेला उपोषण सुद्धा आपण आपल्या सहकाऱ्यांना विनंती करून मागे घ्यायला (Organization for rights of human) लावावे. हे नवीन सरकार आहे, आपल्या मागण्यांचा नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल, आणि आपला प्रश्न सोडविला जाईल.
मुख्यमंत्र्यांची सुरक्षा महत्त्वाची - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आले. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा ही महत्त्वाची असून त्यावर आमची पूर्ण नजर असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. आत्मघाती हल्ला करून एकनाथ शिंदे यांचा जीव घेतला जाईल, अशी धमकी पत्राद्वारे दिली होती. यासंदर्भात माहिती उघड होताचं सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याच्या कटाची खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या इसमास लोणावळा पोलिसांनी केली अटक केली आहे. अजय वाघमारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.