नागपूर - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येच घोटाळा प्रकरणातून क्लीन चीट मिळाली आहे, असे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या सोबतीने सरकार स्थापन केले. त्यावेळी ते निष्कलंक असल्याचे सिद्ध झाले होते का? असा प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
हेही वाचा... एकनाथ खडसेंचं ठरलं... म्हणाले लवकरच पक्षांतर!
अजित पवार हे कोणत्याही घोटाळा प्रकरणात सहभागी नाहीत. हे भाजपला माहित होते, त्यामुळेच त्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी सरकार स्थापन केले. त्यामुळे आता अजितदादांवर बोलण्याचा फडणवीसांना नैतिक अधिकार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
हेही वाचा... CAA protest: उत्तरप्रदेशात हिंसक आंदोलनात ५ जणांचा मृत्यू; तर ८ जण गोळीबारात जखमी
कॅगच्या अहवालात 65 हजार कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता आढळल्याचे पुढे आल्यानंतर जयंत पाटील यांनी नगर विकास मंत्रालयात सर्वाधिक अनियमितता असल्याचा दावा केला. आमचे सरकार चौकशी सरकार नसले, तरी या बाबींची चौकशी करावीच लागेल असेही पाटील यावेळी म्हणाले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांना नक्की गोड बातमी मिळेल, ती शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... आपल्यात आता कोणतेही नाते उरले नाही... नात्यांचे तसे ओझेच होते, तेही उतरले!