नागपुर शिवसेनेने Shiv Sena संभाजी ब्रिगेड Sambhaji Brigade सोबत युती करत शिवसेनेची ताकद वाढली असल्याचा दावा करत असतांना भाजपच्या पाठीत खंजीर खुपसनारे यांची विनाशकालय विपरीत बुद्दी अश्या शब्दांत शिवसनेवर हल्ला चढविला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे नागपुर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
दसरा मेळावा कोण घेणार यावर राज्यात चर्चा दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात कोण दसरा मेळावा घेणार यावर राज्यात चर्चा रंगली आहे. यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री म्हणून एवढच सांगेल की जे नियमात असेल ते होईल. या सरकारमध्ये नियमबाहेर जाऊन काहीच होणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहे. मेळावा हायजॅक होणार का, माध्यमकर्मीच्या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते असून ते मेळावा घेणार आहे की नाही, किंवा उद्धव ठाकरे घेणार आहे की नाही याबद्दल मला कल्पना नसल्याचे म्हणाले आहेत. पण नियमात असेल तर त्यांना परवानगी मिळणार म्हटल्यावर कोणाला परवानगी मिळणार यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
काँग्रेस एक बुडते जाहज सध्या गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद समोर आला आहे. काँग्रेस एक बुडते जाहज आहे. ज्या लोकांना असं वाटतं, हे जहाज बुडण्यापासून वाचणार नाही. ते लोक दुसऱ्या निर्णय घेतात. त्यामुळे गुलाम नबी आझाद यांनी जे काही मुद्दे मांडले ते वास्तव आहे. पण हा काँग्रेस पार्टीचा अंतर्गत विषय त्यावर अधिक टिप्पनी करणे फडणवीस यांनी टाळले. तेच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा नेते यांनी पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेत पैशाचा गैरव्यवहार झाला असे वक्तव्य केले, त्याबद्दल मला कल्पना नाही. त्यावर माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत. अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडणार आहे, अशी चर्चा आहे. मला या संदर्भात माहिती नसल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा twin tower demolish today noida ट्विन टॉवरमधील प्राण्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा