नागपूर - तब्बल दोन वर्षानंतर राज्यात कोरोनाचा (Corona In Maharashtra) धोका आटोक्यात येत असल्याचे वाटतं असताना आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनने (Omicron) टेंशन वाढवले आहे. देशात आणि राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत (Omicron Patient Increase in India) असल्यामुळे परत एकदा जिल्हा स्तरांवर कोविड केअर सेंटर (Nagpur Covid Care Center Ready To Use) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील आमदार निवासात कोविड केअर सेंटर (MLA House Covid Care Center Start) पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती लक्षता घेता ओमायक्रॉन बाधित रुग्णांसाठी १४० खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, परिस्थिती बघून खोल्या आणखी वाढल्या जाणार आहेत.
आमदार निवासातील ५०० खोल्या उपलब्ध -
कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉनच्या नावाची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. आठ दिवसांपूर्वी भारतात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण कर्नाटक राज्यात आढळून आल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा रुग्ण आढळायला लागले आहेत. मुंबई आणि पुणे सारख्या शहरात ओमायक्रॉन व्हायरसने ग्रस्त रुग्ण मिळून आल्यानंतर राज्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. सर्व जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर सज्ज करण्याची सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नागपूरच्या आमदार निवासातील ५०० खोल्यांपैकी इमारत क्रमांक २ मधील १५० पैकी १४० खोल्या पूर्णपणे तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये १ हजार रूग्णांना दाखल करता येईल. मात्र, धोका आणखी वाढल्यास इतर इमारतीतील खोल्या देखील कोविड केअर सेंटरसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.
परदेशातून आलेल्या प्रवाशांना ठेवणार विलगीकरणात -
सध्याच्या परिस्थितीत नागपूर शहरातील कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट येई पर्यत सर्व प्रवाश्यांना आमदार निवसातील कोविड केअर सेंटर मध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.