ETV Bharat / city

Pre-monsoon meeting : मान्सूनपूर्व कामांसाठी मनपाची यंत्रणा पूर्णपणे सज्ज : नागपूर मनपा आयुक्त

author img

By

Published : Jun 2, 2022, 5:06 PM IST

नागपूर महापालिकेत (Nagpur Municipal Corporation) आता मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत लवकर मदत पोहोचली जावी, यादृष्टीने मनपा आयुक्त (Municipal Commissioner and Administrator Radhakrishnan b.) तथा प्रशासकांच्या देखरेखीत संपूर्ण यंत्रणा कार्य करीत आहे. अतिवृष्टी, त्यामुळे जीर्ण घरे पडणे, रस्त्यांवरील झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचून राहणे, अशी परिस्थिती निर्माण होत असते. या सर्व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णत: सज्ज झालेली (Municipal System Ready For Pre Monsoon works) आहे.

Meeting of Municipal Commissioners
महापालिकेत आयुक्तांची बैठक

नागपूर : दरवर्षी पावसाळ्यामध्ये होणारी अतिवृष्टी, त्यामुळे जीर्ण घरे पडणे, रस्त्यांवरील झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचून राहणे, अशी परिस्थिती निर्माण होत असते. या सर्व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णत: सज्ज झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शहरातील दहाही झोनमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

Meeting of Municipal Commissioners
महापालिकेत आयुक्तांची बैठक

नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण तयारीचे नियोजन : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत लवकर मदत पोहोचली जावी, यादृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासकांच्या देखरेखीत संपूर्ण यंत्रणा कार्य करीत आहे. शहर स्तरावरील घटना प्रतिसाद प्रणालीचे ‘इन्सिडेंट कमांडर’ अतिरिक्त आयुक्त (शहर) हे आहेत. या प्रणालीचे नियोजन विभागप्रमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना जबाबदारी देण्यात आली आहे. घटना प्रतिसाद प्रणालीअंतर्गत ऑपरेशन सेक्शन चिफ मुख्य अग्निशमन अधिकारी असून, त्यांच्या नियंत्रणात रिस्पॉन्स ब्रँच हेड कार्यरत आहेत. एकूणच येणाऱ्या संभाव्य धोक्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण तयारीचे नियोजन केले आहे. यासाठी विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

२४ तास नियंत्रण कक्ष सुरू : आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपा मुख्यालयात अग्निशमन विभागाचे २४ तास नियंत्रण कक्ष सुरू आहे. या नियंत्रण कक्षामध्ये अधिकारी व कर्मचारी दोन ते तीन पाळीमध्ये सेवा देत आहेत. नियंत्रण कक्षांमध्ये प्राप्त होत असलेल्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी काही अधिकारी व अभियंत्यांना नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मदतकार्यात सुसूत्रता यावी यासाठी अधिकारी व अभियंत्यांना कार्यासाठी ठराविक दिवस जबाबदारी दिली गेली आहे.

झोननिहाय नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक

१) लक्ष्मीनगर :- 2245833/2245028
2) धरमपेठ :- 2567056/2565589
३) हनुमाननगर :-2755589
४) धंतोली :- 2958401/2958400
५) नेहरूनगर :- 2700090/2702126
६) गांधीबाग :-2735599
७) सतरंजीपुरा :- मो. 7030577650
८) लकडगंज :- 2737599/2739020
९) आशीनगर :- 2655605/2655603
१०) मंगळवारी :- 2596903

हेही वाचा : नागपूर मनपा निवडणुकीसाठी महिला आरक्षण सोडत जाहीर; वाचा, कोणता प्रभाग कोणासाठी आरक्षित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.