ETV Bharat / city

स्थानिक लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले - भंगडीया - Bhandara Latest News

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घोडझरी प्रकल्पांची पाहणी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींना कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याने आमदार बंटी भंगडीया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बंटी भंगडीया
बंटी भंगडीया
author img

By

Published : Jan 8, 2021, 5:56 PM IST

नागपूर - आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घोडझरी प्रकल्पांची पाहणी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींना कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याने आमदार बंटी भंगडीया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक राजकारण बाजूला ठेऊन स्थानिक आमदारांना दौऱ्यात सहभागी करून घेणे अपेक्षित होते, मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशाने आम्हाला डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मागे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार असल्याचं ते म्हणाले आहेत.

विदर्भासाठी वरदान असणाऱ्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा जिल्ह्याचा दौरा केला आहे. गोसेखुर्द प्रकल्पासोबतच त्यांनी लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी प्रकल्पातील कालव्यावरील नॅशनल हायवे क्रॉसिंगची देखील पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात संबंधित विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना मिळणे अपेक्षित होते, मात्र दोन्ही विभागांकडून कोणतीही सूचना न मिळाल्याने आमदार बंटी भंगडीया यांनी संताप व्यक्त केला. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना जाणिवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोपीही त्यांनी केला आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा आम्ही रोखला नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती आम्हाला दिली नाही आणि आम्हाला या दौऱ्यात सहभागी देखील करून घेतलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रश्नच येत नाही, मी किंवा माझ्या एकाही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला नसल्याचा दावा भंगडीया यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची उच्चस्थरीय चौकशी करावी असेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

माझ्या मतदारसंघातील शेतकरी आज पाण्याविना आहे. आजच्या दौऱ्यात आम्हाला बोलावले असते तर काही सूचना आम्ही करू शकलो असतो, वर्षानुवर्षे मी त्या भागात सक्रिय आहे, मात्र सत्ताधारी मंत्र्यांनी दिलेल्या आदेशामुळे आम्हाला या दौऱ्यापासून वंचित ठेवण्यात आले. मात्र, जरी असे असले तरी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, त्यांची भेट घेऊन मी माझ्या जिल्ह्याच्या व्याथा मांडणार असल्याचे यावेळी आमदार भंगडीया यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.