ETV Bharat / city

शिवसेनेने बहुमताच्या ठरावावेळी फारकत घ्यावी, तरच काँग्रेस पुढचा विचार करणार - नितीन राऊत - काँग्रेसचे प्रदेश कार्यध्यक्ष नितीन राऊत

सेना- भाजपमध्ये सरकार स्थापनेवरुन सुरू असलेले राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नसून, जोपर्यंत सेना यातून बाहेर पडत नाही; तोपर्यंत काँग्रेसला यामध्ये कोणताही रस नसल्याचे काँग्रेसचे प्रदेश कार्यध्यक्ष नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने बहुमताच्या ठरावावर फारकत घेतल्यास काँग्रेस पुढची रणनीती आखणार - नितीन राऊत
author img

By

Published : Nov 2, 2019, 1:12 PM IST

नागपूर - बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी शिवसेनने फारकत घेतली, तरच पुढच्या राजकारणाचा विचार केला जाईल, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश कार्यध्यक्ष नितीन राऊत यांनी केले आहे. सेना- भाजपमध्ये सरकार स्थापनेवरुन सुरू असलेले राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नसून, जोपर्यंत सेना यातून बाहेर पडत नाही; तोपर्यंत काँग्रेसला यामध्ये कोणताही रस नसल्याचे राऊत यांनी म्हटले.

शिवसेनेने बहुमताच्या ठरावावर फारकत घेतल्यास काँग्रेस पुढची रणनीती आखणार - नितीन राऊत

अद्याप आमच्याकडे सेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नसून, उभयतांमध्ये चर्चा होईपर्यंत आम्हाला पुढचे पाऊल टाकता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सेना व काँग्रेसच्या विचारसरणीत अंतर असल्याचेही राऊत यांनी अधोरेखित केले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने विधान परिषदेत विरोधी पक्षनेता काँग्रेसचा असला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

तसेच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. तसेच शेतकऱयांना तत्काळ मदत पुरवण्याची मागणीही त्यांनी केली.

Intro:बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोर टेस्ट च्या वेळी शिव सेना फारकत घेत असेल तरच पुढच्या राजकारणाचा विचार या ठिकाणी केला जाईल असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश कार्यध्यक्ष नितीन राऊत यांनी केले...Body:सेना- भाजप मध्ये सरकार स्थापन करण्यावरून जे काही सुरू आहे ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही... सध्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे, गेली पाच वर्षे सत्तेत असूनही सेना-भाजप भांडत आली आहे... जोपर्यंत सेना यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत काँग्रेस ला यात काही रस नसल्याचे राऊत म्हणाले... फ्लोर टेस्ट च्या वेळी सेनेने फारकत घेतली तरच पुढच्या राजकारणाचा विचार याठिकाणी करण्यात येईल असेही ते म्हणाले... सोबतच सेनेचा आमच्याकडे अजूनही कुठला प्रस्ताव नाही, सेना व काँग्रेसच्या विचारसरणीत अंतर आहे,याबाबत जोपर्यंत चर्चा होणार नाही तोपर्यंत आम्हाला पुढे पाऊल टाकता येणार नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केलं... शिवाय विधान सभेचे विरोधी पक्ष नेते पद राष्ट्रवादी कडे जाणार असल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसला मिळाले पाहिजे अशीही मागणी नितीन राऊत यांनी केली.

बाईट -- डॉ नितीन राऊत (प्रदेश कार्याध्यक्ष, काँग्रेस)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.