नागपूर - उत्तरप्रदेश मधील सोनभद्रच्या घटनेतील पीडित कुटुंबीयांना भेटायला गेलेल्या प्रियांका गांधी यांना उत्तरप्रदेश सरकारने थांबवल्यानंतर नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी उग्र आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी मोदी आणि योगी सरकार विरोधात घोषणा देत त्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. नागपूर ग्रामीण काँग्रेस भवनच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस आमदार सुनील केदार हे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी होते.
उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात घडलेल्या हत्याकांडाच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. शुक्रवारी काँग्रेस उपाध्यक्ष प्रियंका गांधी सोनभद्रला जात असतानाच, त्यांच्या वाहनांचा ताफा पोलिसांकडून अडवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून देशभरात प्रदर्शन सुरू झाले असताना नागपूरच्या ग्रामीण काँग्रेस भवनच्या समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज उग्र आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी मोदी आणि योगी सरकार विरोधात घोषणा देत त्यांचे पुतळे जाळले. नागपूर ग्रामीण काँग्रेस भवनच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस आमदार सुनील केदार सहभागी झाले होते.