नागपूर - मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे गणेशोत्सव. आज बाप्पा विराजमान झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरातील प्रसिद्ध चितार ओळीत गणेशमूर्तीच्या खरेदीची लगबग पाहायला मिळाली. शिवाय या भागात मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा दिसून येत आहे. असे असले तरी दरवर्षी पेक्षा यावर्षी मात्र, कोरोनामुळे चितार ओळीतली भाविकांची गर्दी फारच कमी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महारानगरपालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
कोरोनामुळे या वर्षी गणेशोत्सवात शुकशुकाट पाहायाला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारकडून नियमावली देखील आखून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गणरायाचे आगमन होत आहे. नागपुरातील गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या चितार ओळीत भाविकांची लगबग पाहायला मिळाली आहे. नागरिकांकडून उत्साहात बाप्पाचे स्वागत केले गेले आहे. शिवाय महारानगरपालिकेकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन होत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. असे असले तरी दरवर्षी प्रमाणे यावर्षी मात्र भाविकांमधील तो उत्साह कमी असल्याचे दिसून येत आहे.
मागील दोन दिवसांपासूनच घरगुती गणेश मूर्तींची नागरिकांकडून खरेदी केल्याचे चित्र आहे. शिवाय महारानगरपालिकेकडून जाहीर केलेल्या नियमानुसार फक्त २ व्यक्ती गणेश मूर्ती खरेदी साठी चितार ओळीत आल्याचे पाहायला मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर चितार ओळीत सोशल डिस्टन्सींग वा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त देखील दिसून येत आला आहे. शिवाय या भागात पोलिसांकडून वारंवार गस्त घालत नागरिकांना आवाहन देखील केले जात आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी नागरिकांकडून छोट्या मूर्तीला अधिक पसंती दिली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय दरवर्षीपेक्षा या वर्षी तो उत्साह कमी आहे. मात्र नियमांचे पालन करूनच बाप्पाचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आली. शिवाय महारानगरपालिकाकडून आखून दिलेल्या नियमांचे पालन देखील सर्वच नागरिकांनी करावे, असेही भाविकांकडून आवाहान केले जात आहे. असे असले तरी बाप्पाच्या या उत्सवात काही तरी कमतरता असल्याचेही भावनाही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. शिवाय कोरोनाचा हा संकट बाप्पा घेऊन जाईल हा आशावादाही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला. त्यामुळे दरवर्षी पेक्षा या वर्षी मात्र भाविकांचा काहीसा हिरमोड झाल्याचेही दिसून येत आहे.