नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शेख हुसेन ( Sheikh Hussein ) याच्यावर नागपूर पोलिसांनी ( Nagpur Police ) गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधींना इडी कार्यालयात ( ED Office ) चौकशीसाठी बोलाविल्यानंतर नागपुरात इडी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. यावेळी शेख हुसेन याने पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.
भाजप कार्यकर्त्यांनी दिली तक्रार - नागपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसैन यांच्यावर अखेर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी नागपूरच्या ईडी कार्यालयाबाहेर सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी बोलताना शेख हुसैन यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसने नेते शेख हुसैन विरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता नागपूर पोलिसांनी शेख हुसैन विरोधार गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडिओ क्लिप व्हायरल - शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात अपशब्द वापरल्याची व्हिडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर काल भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शेख हुसैन विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी शेख हुसैन यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 294 व 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शेख हुसेनची जीभ घसरली - 13 जूनला काँग्रेसच्या वतीने नागपूर ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. त्यावेळी मोदी सरकार विरोधात भाषणे झाले. पण याच दरम्यान काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांची टीका करताना जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात ते आक्षेपार्ह बोलून गेले. आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यावर या असे बोललो म्हणून माझ्यावर एखादी नोटीस बजावली जाईल, पण मला त्याची पर्वा नाही, असे शेख आपल्या भाषणात म्हणाले होते. यांसदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल पोलिसांनी घेतली व शेखवर गुन्हा दाखल केला.
हेही वाचा - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील 'विरोधकांच्या बैठकी'ला तडा?