ETV Bharat / city

Chef Vishnu Manohar : प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांची विश्वविक्रमांची घोडदौड सुरुच - विष्णुजी की रसोई

हजारो किलोंची साबुदाणा खिचडी तयार करण्यापासुन ते अनेक खाद्य पदार्थ हजारो किलोंच्या संख्येत तयार करण्याचा विक्रम मोडीत काढणारे नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर (Chef Vishnu Manohar) यांनी आणखी एक नवा विक्रम आपल्या नावी केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य त्यांनी 75 तांदळाच्या प्रकारापासून, 75 भाताच्या रेसिपी तयार करून नवा विश्वविक्रम (world record) नोंदवला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेले वेग वेगळे वान सगळ्यांना माहीती असावे. आणि त्या अन्नदात्याच्या मेहनतीला याेग्य मुल्य मिळावे. यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य शेतकऱ्यांना समर्पित भावनेने त्यांनी हा विश्व विक्रम केला असल्याचं त्यांनी सांगितलं.

Chef Vishnu Manohar
प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर
author img

By

Published : Jul 19, 2022, 8:05 PM IST

नागपूर : भारतीय खांद्य संस्कृती आणि त्यात असणारे विविध पदार्थ हे सगळ्यांनाच भुरळ घालतात. पण याच व्यंजनाची लज्जत वाढवण्यासाठी नवं नवीन प्रयोग केले जात असतात शेफ यांच्याकडून. असेच काहीसे प्रयोग करतांना मूळचे नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर (Chef Vishnu Manohar)यांनी अनेक विश्व विक्रम (world record) केले आहे.

शेफ विष्णु मनोहर यांच्याशी संवाद साधतांना प्रतिनिधी

कधी 3 हजार किलोची खिचडी, 4 हजार किलोचे जळगांवचे प्रसिद्ध भरीत, तर कधी 7 हजार किलोची मिसळ अश्या पद्धतीचे व्यंजन बनवत अनेक विश्वविक्रम त्यांनी स्वतःचा नावावर केलेत. नुकताच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य त्यांनी 75 तांदळाच्या प्रकारापासून, 75 भाताच्या रेसिपी तयार करून विश्वविक्रम नोंदवला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेले वेग वेगळे वान सगळ्यांना माहीती असावे. आणि त्या अन्नदात्याच्या मेहनतीला याेग्य मुल्य मिळावे. यासाठी स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्य शेतकऱ्यांना समर्पित भावनेने त्यांनी हा विश्व विक्रम केला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा हा विश्व विक्रम तयार करण्याचा प्रवास एकंदर कसा सुरु झाला, हे जाणून घेऊ या विशेष रिपोर्ट मधून....

कॅटरिंगच्या व्यवसायातुन स्वतःच्या उद्योगाला सुरवात : मूळच्या नाशिक जिल्ह्यातील मनोहर कुटुंबात वडील दिगंबर मनोहर चित्रकार तर आई गायक होत्या. याच कुटुंबातील विष्णु यांनी कॅटरिंगच्या व्यवसायातुन स्वतःच्या उद्योगाला सुरवात केली. आज तोच मित्रांचा विष्णु, प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर या नावाने ओळखले जातात. हे नावं केवळ महाराष्ट्रपुरते राहिले नाही, तर परदेशात सातासमुद्रापार पोहचले आहे. अमेरिकेत देखील 'विष्णुजी की रसोई' (Vishnuji Ki Rasoi) या नावाने त्यांनी हॉटेल उघडले आहे. या हॉटेलात खासकरून महाराष्ट्रीयन पदार्थ वरण, भात, भाजी, पिठलं, ठेचा, भाकर हे खायला मिळत असल्याने, तिथला मराठी माणुस सुखावला आहे.

5 बाय 7 आकाराचा पराठा : कॅटरिंगच्या व्यवसाय असल्याने अनके राज्यातून आचारी त्यांच्याकडे काम करायला असायचे. पण बरेचदा काम नसल्यास आर्थिक अडचणी निर्माण व्हायच्या. असच काही घडत असतांना शेफ विष्णु मनोहर यांनी सण 2000 साली पराठा महोत्सव घेतला. या कार्यक्रमाला त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सर्वात मोठा 5 बाय 7 आकाराचा पराठा बनवत विक्रम केला. त्यातून पराठा महोत्सवाला लोकांची गर्दी झाली आणि उद्देश साध्य झाला. पुढेही फूड फेस्टिव्हल सुरू राहिला आणि अनेक पदार्थांची चव नागपूर वासियांसह परप्रांतातल्या लोकांना चाखायला मिळाली. विदर्भात खासकरून ओळख असलेला पाहूनचाराचा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. त्यामुळे भलीमोठी पुरणपोळी मुंबईत तयार करून स्वतःच्या विक्रमाच्या यादीत भर घातली.

सलग दोन दिवस 7 तास (एकूण 53 तास) पदार्थ बनवत केला मोठा विश्वविक्रम.... नुकतेच नागपुरात 53 तास सलग 750 पदार्थ बनवले गेले. हा विक्रम लोकांची भूक भागवणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना समर्पित करीत त्यांनी 53 तास स्वयंपाक केला. यावेळी त्यांनी सलग 40 तास स्वयंपाक करण्याचा अमेरिकेन शेफ बेनजमीन पेरी यांचा रेकॉर्ड मोडला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य त्यांनी 75 तांदळाच्या प्रकारापासून, 75 भाताच्या रेसिपी तयार करून विश्वविक्रम नोंदवला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेले वेग वेगळे वान सगळ्यांना माहीती असावे. आणि त्या अन्नदात्याच्या मेहनतीला याेग्य मुल्य मिळावे. यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य शेतकऱ्यांना समर्पित भावनेने त्यांनी हा विश्व विक्रम केला असल्याचं त्यांनी सांगितलं.

5 हजार किलोचो खिचडी : विश्व खाद्य दिवसाच्या औचित्यवर 14 ऑक्टोबर 2018 मध्ये 3 हजार किलोचे खिचडी बनवण्यात आली. त्यांनंतर त्यांनी स्वतःचाच रेकॉर्ड मोडीत काढला. व साडेपाचशे किलोची खिचडी बवण्याचा रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांनी जळगांव जिल्ह्यातील फेमस असलेले भरीत बनवण्याचा ठरवले. 21 डिसेंबरला 120 जणांच्या मदतीने 6 तासात 3 हजार किलोचे भरीत बनवले. त्यानंतर पुन्हा नवीन विक्रमाची वाटचाल करत, त्यांनी लगेच जानेवारी 2019 मध्ये दिल्लीत भाजपच्या एका कार्यक्रमात त्यांनी 5 हजार किलोचो खिचडी बनवली. यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी यात सहभाग घेतला होता. दिल्लीकरांना खिचडीचा स्वाद चाखवत पुन्हा स्वतःचा रेकॉर्ड नोंदवला.

सबुदाना खिचडी, पुणेरी मिसळ,व्हेज कबाब चा रेकॉर्ड ब्रेक :
6 मार्च 2020 ला साई मंदिरात 1100 किलो सबुदानाची खिचडी तयार करुन देखाल एक नवा विक्रम आपल्या नावी केला. 14 मार्च 2021 मध्ये पुणेरी मिसळचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा संकल्प घेतला. यावेळी त्यांनी सात तासात सात हजार किलो मिसळ शिजवण्याचा विक्रम नोंदवला. यावेळी त्यांनी या मिसळीचा वाटप गरजू लोकांना अन्नदान करत केले. तसेच त्यांनी व्हेज पदार्थाला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी 8 फूट लांबलचक 40 किलोचा व्हेज कबाब बनवत सुद्धा स्वतःचा रेकॉर्ड नागपुरात केला होता. 1500 किलो सेंद्रिय शेतीतील भाजीकरून ऑर्गनिक भाजीपाला महत्व देण्याचा संदेश दिला. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तांदळाचा सन्मान करण्यासाठी नुकताच 75 तांदळाच्या प्रकारापासून 75 रेसिपी करत त्यांनी नवा आगळा वेगळा रेकॉर्ड बनवत 11 विश्वरेकॉर्ड नोंदवले आहे.

पुढला विश्वविक्रम अमेरिकेत करण्याचे उद्दिष्ट्य : अमेरिकेतील दूतावासाचे लोक एकदा नागपुरात आले असतांना त्यांनाही 'विष्णुजी की रसोई' इथली चव आवडली. यावरूनच त्यांनी अमेरिकेत विष्णू जी की रसोई ब्रांच सुरू करत अमेरिकेत स्वतःच्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. याच ठीकाणी 3 हजार किलो बिर्यानी करण्याचा त्यांचा मानस आहे. एक प्रयत्न केला तो असफल झाला. पण पुढल्यावर्षी मिशन बिर्याणी असणार, तेही अमेरिकेत. हा विश्वविक्रम करणार, नक्की करणार असेही ते म्हणालेत.

शेतकरी अन्नदाता केंद्रबिंदू ठेवत विश्वविक्रम : विश्वविक्रम करतांना अनेकदा शेतकरी हा त्यामधला केंद्रबिंदू राहिला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या सेंद्रिय भाजीपाला असो की, शेतकऱ्यांने पिकवलेले तांदूळ असो, अन्नदात्यानी पिकवलेल्या धान्याला शिजवत आपली साधना अर्पण करणे. अशी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या विश्वविक्रमाची वाटचाल अशीच सुरू ठेवली आहे. यातूनच पुढील काळात अनेक विक्रम होत राहिल.

हेही वाचा : Eating Bright-Coloured Fruits : चमकदार रंगाची फळे खाल्ल्याने महिला अधिक काळ जगतात - अभ्यास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.