नागपूर - बारामतीत आम्ही आमचा पक्ष वाढवला तर घड्याळाची टिकटिक नक्की बंद होईल असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule ) यांनी केला होता. मात्र, माझ्या वक्तव्याला वैयक्तिकरित्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला आहे. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ( Nagpur press conference ) बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, की शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत आरोप करायचे नाही. वैयक्तिक आरोप करून मोठे व्हायचे नाही. भाजपची तशी संस्कृती नसल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. राज्याच्या प्रत्येक भागात आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे,त्यामुळे जेव्हा आम्ही बारामतीमध्ये लक्ष केंद्रित करू तेव्हा घड्याळ बंद पडल्याशिवाय राहणार नाही, असे देखील ते म्हणाले आहेत. शनिवारपासून भारतीय जनता पक्षाचा सेवा पंधरवडा सुरू होतो आहे त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले आहे. ( Political Statements personally Chandrasekhar Bawankule )
काँग्रेस डुबतं जहाज - काँग्रेस पक्ष आता दुखते जहाज आहे तर आम्ही प्रचंड वेगाने धावणारी बुलेट ट्रेन आहोत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपची तुलना कुणीही करू नये,दिवसभर भाजपवर आरोप करत नाना पटवले मोठे होण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
वेगळ्या विदर्भाला समर्थन - नवीन राज्यांच्या निर्मितीचा मुद्दा येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष वेगळ्या विदर्भाचे समर्थन करेल. वेगळा विदर्भ झाला पाहिजे ही आमची भूमिका आजही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.