नागपूर - संवेदनशील गृहमंत्री असते तर इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप लागल्यानंतर राजीनामा दिला असता. पण 24 तास लोटूनही राजीनामा न दिल्याने भाजपच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला होता. यावेळी संविधान चौकात आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पैसे गोळा करून आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांना देऊ, असेही माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. यावेळी आमदार प्रवीण दटके, माजी माहापौर संदीप जोशी हे आंदोलनात सहभागी होते. तसेच आतापर्यंत कौतुक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का? असा सवाल त्यांनी केला आहे.
गृहमंत्री यांची डिमांड पूर्ण केली नाही-
गृहमंत्र्यावर आरोप होण्यापूर्वी अनेक कर्यक्रमात व्यासपीठावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग हे चांगले अधिकारी असल्याचे म्हटले होते. मुंबईत पोलीस आयुक्त म्हणून त्यांची निवड केली. आता गृहमंत्री यांची डिमांड पूर्ण केली नाही. त्यांनी मागितलेले 100 कोटी मिळाले नाही. आता त्यांनी केलेले आरोप फेटाळत आहेत. यापूर्वी कधीही असे झाले नाही. पोलीस विभागातील अधिकाराऱ्याने आरोप केले नाहीत. आतापर्यंत राजीनामा देणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. यात ठाकरे सरकारमधील लोकांचे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे आणि ते प्रकरण बाहेर येत आहे.
100 कोटीची मागणी हा मोठा आरोप आहे. या गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा भाजप सरकार आंदोलन करेल आणि हे आंदोलन राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे, असाही इशारा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
हेही वाचा- अँटिलिया प्रकरणाच्या तपासात केंद्राने हस्तक्षेप करावा, अनेक नावे पुढे येतील - राज ठाकरे