ETV Bharat / city

Vidarbha Weather Update : असानी चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता - Cyclone Asani

पश्चिम बंगालच्या उपसागरात आलेल्या असानी चक्रीवादळामुळे ( Cyclone Asani ) पूर्व विदर्भाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता ( Chance of rain in some parts of East Vidarbha ) आहे. चक्रीवादळामुळे राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण झाले ( Vidarbha Weather Update ) असून, पुढील दोन दिवस ही परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Vidarbha Weather Update
विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता
author img

By

Published : May 11, 2022, 2:59 PM IST

नागपूर : दोन ते अडीच महिन्यांपासून नागपूरसह विदर्भात सूर्य नारायण अक्षरशः आग ओकतो आहे. अनेकदा तापमानाचा पारा 45 पर्यंत गेल्यानंतर आता मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढतो की काय? अशी नागपूरकरांना भीती वाटतं आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या असानी चक्रीवादळामुळे ( Cyclone Asani ) मुख्यतः पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता निर्माण झाली ( Chance of rain in some parts of East Vidarbha ) असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. असानी चक्रीवादळाचा परिणाम दोन ते तीन दिवस ( Vidarbha Weather Update ) जाणवेल. मात्र, त्यानंतर पुन्हा सूर्य तळपणार असल्याची माहिती हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली आहे.

दोन दिवस ढगाळ वातावरण : असानी चक्रीवादळामुळे दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण होईल. त्यामुळे तापमानात काहीसी घट होण्याची शक्यता आहे. त्यातून नागरिकांना दिलासा मिळेल. मात्र शनिवारपासून पुन्हा सूर्य तापायला लागेल. तेव्हा विदर्भातील अनेक जिल्ह्याचे तापमान 45 डिग्रीच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असानी चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता

उष्णता वाढेल, नागरिकांनी काळजी घ्यावी : दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने आता कुलर देखील उपयोगाचे नसल्याचं दिसत आहे. तापमान वाढीमुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. पुढील काही दिवस सूर्याचा प्रकोप कायम राहणार असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दुपारच्या वेळेस तापमान सर्वाधिक असल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात निघणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

नवतपाची चाहूल : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागपूरसह विदर्भातील नवतपा सुरू होणार आहे. नवतपा म्हणजे सर्वात उष्ण नऊ दिवस. पावसाळा सुरू होण्याच्या आधी नवतपा येतो अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. नवतपाचा प्रभाव अधिक राहिल्यास पाऊस देखील चांगल्या प्रमाणात होईल अशी मान्यता आहे. मात्र हवामान विभागाच्या शास्त्रोक्त पद्धतीत नवतपाची कोणतीही नोंद ( Vidarbha Weather Forecast May 2022 ) नाही.

रस्ते निर्मनुष्य : दुपारच्या वेळेत उन्हाची दाहकता इतकी वाढते की, शहरातील सर्वच रस्ते दुपारच्या सुमारास निर्मनुष्य होतात. सिग्नलवर देखील थांबणे जीवघेणे ठरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळेल त्या ठिकाणी सावलीत आश्रय घेताना नागरिक दिसून येत आहेत. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा : Asani Cyclone : असानी चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.