ETV Bharat / city

नितीन गडकरींचा अपमान कोणी केला आणि मग काय घडले? वाचा.. - शाळेचे दिवस गडकरी भाषण

शाळेत मित्रांसोबत मागे बसून मुलीने चुकीचे भाषण दिल्याने तिची खिल्ली उडवली, त्यामुळे मुख्याध्यापकांनी मारले. या अपमानातून सावरताना भाषण द्यायला कशा पद्धतीने सुरवात झाली, याचाच किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिक्षक दिनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितला.

South Public School program gadkari
साऊथ पब्लिक स्कुल कार्यक्रम गडकरी
author img

By

Published : Sep 5, 2021, 5:58 PM IST

Updated : Sep 7, 2021, 2:49 PM IST

नागपूर - शाळेत मित्रांसोबत मागे बसून मुलीने चुकीचे भाषण दिल्याने तिची खिल्ली उडवली, त्यामुळे मुख्याध्यापकांनी मारले. या अपमानातून सावरताना भाषण द्यायला कशा पद्धतीने सुरवात झाली, याचाच किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिक्षक दिनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितला.

बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

हेही वाचा - तान्हा पोळा - अबब!! सव्वा लाखाचा नंदी

गडकरी नागपूरच्या साऊथ पब्लिक स्कुलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शाळेचे संस्थापक दीनानाथ दस्तुरे आणि त्यांच्या पत्नीचे अर्ध पुतळ्याचे अनावरण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर महापौर दयाशंकर तिवारी, राज्यसभेचे खासदार डॉ. विकास माहत्मे, आमदार मोहन मते, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला काही शिक्षकांचा त्यांच्या चांगल्या कार्यासाठी गौरव करण्यात आला.

..हा आहे किस्सा

यावेळी गडकरी त्यांची भाषण कला, ज्याचे आज हजारो यूट्यूबर फॉलोवर्स आहे, याबाबत सांगताना म्हटले की, शालेय जीवनात असताना शाळेत मुलगी इंग्रजित भाषण देताना चुकली. यानंतर तिची मजा आम्ही उडवली. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी कान उपटले. त्या मुलीत असलेले डेअरिंग तुमच्यात नाही, असे म्हणत शिक्षकांनी सुनावले. हाच अपमान मनात धरून चला भाषण देऊ पाहू म्हणत सुरवात केली. त्यावेळी मुख्याध्यापकांनी मारले नसते, तर कदाचित भाषण देणे शिकलो नसतो. आज युट्यूबकडून भाषण देण्याचे 4 लाख रुपये महिना मिळतो. यामुळे छोट्यात छोटा माणूस देखील अनुभवातून मोठा होतो. अमिताभ बच्चन हे बीएस्सी दोनदा नापास आहे. त्यांना चेहरा, आवाजामुळे नाकारले, पण ते हरले नाही, त्यांनी आयुष्याचा संघर्ष सुरू ठेवला. आज ते यशस्वी झाले आहेत.

तिकीट काढण्याचा तो किस्साही वाचा

पिच्चरची आवड असल्याने 85 पैशांचे तिकीट काढून पिच्चर बघायला जायचे आणि आरडा ओरडा करायचे. तेच आर्केस्ट्रा हा मागून पाहायचा, कारण खिशात तेवढे पैसे नसायचे. एकदा ऋषी कपूरचा पिच्चर लागला तेव्हा चार मित्रांनी तिकीट काढण्यासाठी लाईनमध्ये घुसून तिकीटच्या खिडकी पर्यंत जाऊन तिकीट काढण्याचाही किस्सा आणि शालेय जीवनातील आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला.

माणूस कुठल्या मशीनच्या साच्यात टाकून चांगला होऊ शकत नाही

माणूस चांगला नागरिक म्हणून जेव्हा परीक्षा पास होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या परीक्षेला, त्या गुणवत्तेला काही अर्थ आहे. सुशिक्षित असणे, सुसंस्कृत असणे यात फरक आहे. सुशिक्षित खूप आहेत, पण सुसंस्कृत नाही. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकडोजी महाराज, गजानन महाराज हे कुठल्याही विद्यापीठात नव्हते गेले. त्यांनी पीएचडी घेतली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचे प्रेरणा स्रोत आहेत. सुशिक्षित बनताना सुसंस्कृत बनणे, चांगला नागरिक बनणे, हे सर्वात आवश्यक आहे. चांगला नागरिक हा कुठे मशीनच्या साच्यात टाकून चांगला होऊ शकत नाही, असे गडकरी म्हणाले.

100 टक्के चांगला असलेला माणूस अस्तित्वात असूच शकत नाही. माणूस म्हटले तर, गुणदोष असणारच. ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करणे, हेच देशाचे भविष्य आहे, असे गडकरी म्हणाले. त्याचबरोबर, उत्तम डॉक्टर, उत्तम वकील, उत्तम शिक्षक होणे आवश्यक आहे. पण, त्याहीपेक्षा उत्तम माणूस देखील बनणे आवश्यक आहे. गुरूच्या सांगण्यातून आपल्यातले गुण दोष कमी करणे आणि गुण वाढवणे हे आपल्या सगळ्यांना सातत्याने जीवनात करत राहावे लागते. जो जन्माला येतो तो माणूस म्हणून काय जीवन जगाला यापेक्षा कसे जीवन जगाला, हा महत्त्वाचा भाग आहे, असेही गडकरी म्हणालेत.

हेही वाचा - जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा मुळ गाभा हा राष्ट्रवादी विचारांचा - संघ विचारक सुधीर पाठक

Last Updated : Sep 7, 2021, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.