ETV Bharat / city

सेलिब्रिटी ट्विट प्रकरण : भाजप आयटी सेलप्रमुख आणि 12 सोशल इन्फ्लून्सरचे नावं समोर - गृहमंत्री

सेलिब्रिटी ट्विट चौकशी प्रकरणात माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर खासगी रुग्णालयातून बाहेर पडताना गृहमंत्री माध्यमांशी बोलत होते.

anil deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Feb 15, 2021, 6:32 PM IST

Updated : Feb 15, 2021, 7:35 PM IST

नागपूर - सेलिब्रिटी ट्विट चौकशी प्रकरणात माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ट्विटमागे असणाऱ्या भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि 12 सोशल इन्फ्लून्सरचे नाव प्राथमिक चौकशीत पुढे आले असून, तपास सुरू असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर खासगी रुग्णालयातून बाहेर पडताना गृहमंत्री माध्यमांशी बोलत होते.

गृहमंत्री अनिल देशमुख

त्यावेळी भाजपच्या आयटी सेलप्रमुखाची चौकशी करू असे आदेश दिले होते. पण त्याऐवजी माझ्या तोंडून लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत खुलासा करताना गृहमंत्री म्हणाले की, लतादीदी आमचे दैवत आहेत. सचिन तेंडुलकर हे मोठं व्यक्तीमत्व आहे. त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता.

प्राथमिक चौकशीत नावे आली पुढे

भाजप आयटी सेलच्या प्रमुखाच्या चौकशीचे मी आदेश दिले होते. यात आयटी सेलने काही स्क्रिप्ट दिली का? याबाबतची प्राथमिक चौकशी झाली आहे. यात भाजपच्या आयटी प्रमुख आणि 12 इन्फ्लून्सरचे नावं पुढे आले आहेत.

काय होते सेलिब्रिटी ट्विट प्रकरण

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला धरून मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटींनी ट्विट केले होते. यात काहींनी समर्थनात तर काहींनी विरोधात ट्विट केले होते. या प्रकरणात मोदींची होत असलेली बदनामी थांबण्यासाठी हे सगळं चाललं असल्याचा आरोपही काँग्रेसह अन्य काही लोकांनी केला होता. काँग्रेसच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांना ट्विटर हँडल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात आता 12 लोकांची नावे पुढे आले असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

ते 12 नावे कोणती

यात सध्या भाजपच्या आयटी सेल प्रमुखासह 12 लोकांची नावे समोर आली आहेत. हे सर्व सोशल मीडियात प्रभावी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ती 12 नावे कोणती आहेत याचा खुलासा झाला नाही.

हेही वाचा - 'त्या' तरुणीची हत्या नाही, तर आत्महत्याच- धनंजय मुंडे यांचा दावा

हेही वाचा - कोरोना लोकलने प्रवास केल्यानेच होतो का? रेल्वे प्रवासी संघटनेचा सवाल

Last Updated : Feb 15, 2021, 7:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.