ETV Bharat / city

Nagpur Police : वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की; सुरक्षा रक्षकावर अदखलपात्र गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी एका वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला खासगी हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली ( Hotel Guard Opposes Police Action Against Illegally Parked Vehicles ) होती. याप्रकरणी हॉटेल कर्मचाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ( Case Register Kotwali Police Station Against Hotel Guard ) आहे.

Nagpur Police
Nagpur Police
author img

By

Published : Jul 28, 2022, 4:55 PM IST

नागपूर - नागपूरात काही दिवसांपूर्वी एका वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला खासगी हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती. तिरंगा चौकातील एका हॉटेल बाहेर रस्त्यावर नो-पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या दुचाकी टोइंग व्हॅनच्या मदतीने उचलत असताना हा प्रकार घडला ( Hotel Guard Opposes Police Action Against Illegally Parked Vehicles ) होता. याप्रकरणी खासगी सुरक्षा रक्षकाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ( Case Register Kotwali Police Station Against Hotel Guard ) आहे.

वाहतूक पोलीस निरीक्षक प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

...अन् पोलिसाच्या अंगावर हात उगारला - ही घटना 23 जुलै रोजी रात्रीच्या वेळेस घडली आहे. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांनी आपल्या गाड्या नो पार्किंग मध्ये अस्तव्यस्त पध्दतीने उभ्या केल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. याबाबत सूचना मिळाल्यानंतर वाहतूक विभागाचा पोलीस कर्मचारी मधुकर राठोड त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन तिरंगा चौकातील हॉटेल समोर पोहोचले. त्यावेळी त्यांनी अस्तव्यस्त असलेल्या गाड्या टोइंग व्हॅनच्या मदतीने उचलण्यास सुरुवात केली, असता हॉटेलच्या खाजगी सुरक्षा रक्षकाने अचानक त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्या सुरक्षारक्षकाने मधुकर राठोड यांच्या अंगावर देखील हात घातला. या घटनेचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केल्यानंतर तो व्हिडिओ दोन दिवसांनी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

सुरक्षारक्षकावर अदखलपात्र गुन्हा दाखल - वाहतूक पोलीस कर्मचारी आणि खाजगी सुरक्षा रक्षकांमध्ये खडाजंगी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर हॉटेलमधील सुरक्षारक्षक पांडे विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या आधारे पोलिसांनी पांडे विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - Shivendra Raje Bhosale: पालिकेची निवडणूक आल्याने उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी; शिवेंद्रराजेंचा टोला

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.