ETV Bharat / city

Ajit Parse Financial Fraud : अजित पारसे यांच्याविरोधात 4.5 कोटींचा फसवणूकीचा गुन्हा

राजकीय पक्षातील लहान-मोठ्या नेत्यांच्या जवळ असलेला सोशल मीडियाचा इन्फल्यूसर ( Social media influencer ) म्हणून मिरवणारा अजित पारसे ( Offense against Ajit Parse ) विरुद्ध नागपूर शहर ( Crime against Ajit Parse in Nagpur city ) पोलिसांनी साडेचार कोटीं रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा ( Ajit Parse Financial Fraud ) गुन्हा दाखल केला आहे.

Ajit Parse
अजित पारसे
author img

By

Published : Oct 13, 2022, 3:54 PM IST

Updated : Oct 13, 2022, 4:32 PM IST

नागपूर - सत्ताधारी तसेच विरोधकांसह विविध राजकीय पक्षातील लहान-मोठ्या नेत्यांच्या जवळ असलेला सोशल मीडियाचा इन्फल्यूसर ( Social media influencer ) म्हणून मिरवणारा अजित पारसे ( Offense against Ajit Parse ) विरुद्ध नागपूर शहर ( Crime against Ajit Parse in Nagpur city ) पोलिसांनी साडेचार कोटीं रुपयांची आर्थिक फसवणूक ( Ajit Parse financial fraud ) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार

साडेचार कोटींची फसवणुक - अजित पारसेने ( Ajit Parse ) एका होमिओपॅथी डॉक्टरला होमिओपॅथी रुग्णालय सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तब्बल साडेचार कोटी रुपये उकळले. डॉक्टरला स्वतःची फसवणूक झाल्याचं समजताचं कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अजित पारसेच्या घराची झडती घेतली असता सीबीआय, पीएमो अनेक केंद्रीय महत्वपूर्ण कार्यालयांसह राजकीय पक्षांच्या नावाचे खोटे लेटरहेड सुद्धा आढळून आले आहेत.

केंद्रीय कार्यालयाचे खोटे लेटरहेड जप्त - डॉक्टर राजेश मुरकुटे यांच्या तक्रारीवरून रात्री पोलिसांनी अजित पारसेच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात सीबीआय, पीएमो आणि अनेक केंद्रीय महत्वपूर्ण कार्यालयांसह राजकीय पक्षांच्या नावाचे खोटे लेटरहेड,स्टॅम्प सह अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या आहेत. एवढंच नाही तर अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो त्याच्या घरी मिळून आले आहे.

अनेकांना अडकवले हनीट्रॅपमध्ये - सोशल मीडियाचा इन्फल्यूसर,विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणून मिरवणाऱ्या अजित पारसे बड्या शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील नामांकित डॉक्टरांना हनीट्रॅपमध्ये अडकवून कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती तपासा दरम्यान पुढे आली असल्याचं नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. फसवणूकीची रक्कम सुमारे 25 कोटी रुपये असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. आरोपी अजित पारसे हा अनेकांना दिल्लीतील नेत्यांसोबत ओळख देण्याच्या बहाण्याने दिल्लीत नेत होता. दिल्ली दौऱ्यात तो त्या व्यक्तीची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करायचा. याच दरम्यान ते खोलीत तरुणीला पाठवून तिच्या सोबत अश्लील छायाचित्रे काढायचा. त्यानंतर छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन पारसे यांनी खंडणी वसूल करत होता.

सीबीआय चौकशीची धमकी देऊन पैसे उकळले - अजित पारसेने अनेकांना सीबीआय चौकशीची धमकी देऊन कोट्यवधी रुपये वसूल केल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. माझी पंतप्रधान कार्यालय, सीबीआय मध्ये ओळख आहे. तुमच्या विरुद्ध सीबीआयची गुप्त चौकशी सुरू असून तुम्हाला अटक सुध्दा होऊ शकते अशी भीती दाखवून अजित पारसे ने अनेकांना लुटल्याचे पुढे आले आहे.

Last Updated : Oct 13, 2022, 4:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.