नागपूर - पचायला हलकी असल्यामुळे सकाळच्या नाश्यात इडलीला जास्त पसंत दिली जाते. मात्र, नागपूर येथील कुमार रेड्डी या प्रयोगशील इडली विक्रेत्याने तयार केलेली काळी इडली ( Black Idli in Nagpur )ची सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. काळी इडली खाण्यासाठी केवळ नागपूरकरच नाही तर इतर ठिकाणाहूनही नागरिक गर्दी करत आहेत. इंटरनेटवरही ही काळी इडली चांगलीच व्हायरल ( Black Idli Viral ) झाली आहे.
कुमार रेड्डी यांना सुरुवातीपासूनच काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची इच्छा होती. रेड्डी हे मुळचे दाक्षिणात्य असल्यामुळे त्यांनी हौस म्हणून इडलीचे दुकान सुरू करण्याचा निर्धार केला. सिव्हिल लाईन भागातील रामगिरी या मार्गावर मॉर्निंग वॉक करण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी असते. त्यामुळे रेड्डी यांनी या भागात आपले छोटेसे दुकान सुरू केले. बघता बघता त्यांच्या दुकानावर अनेकांनी गर्दी करायला सुरुवात केली. इडलीची चवदार वाटत असल्याने अनेकांनी त्यांना इडलीत प्रयोग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रेड्डी यांनी पारंपरिक इडलीची चव कायम ठेवत इडलीवर नाविण्यपूर्ण प्रयोग करू लागले.
मित्रांच्या आग्रहावरून तयार केली ब्लॅक इडली
इडली विकतानाच रेडी यांनी इडली सोबत नवनवीन प्रयोग सुरू केले होते. खाण्याचे रंग वापरून त्यांनी अनेक प्रकारच्या इडल्या तयार केल्या, एवढेच काय तर अंडा इडलीचाही प्रयोग त्यांनी केला. मात्र, अंडा इडली लोकांना आवडली नाही. याच दरम्यान रेड्डी यांच्या मित्रांनी काळ्या रंगाची इडली तयार करण्याचा ( How To Make Black Idli ) आग्रह धरला. त्यानंतर रेड्डी यांनी माहिती घेत संत्र्याची साल, नारळाचे आवरण यांना वाळवून, भाजून त्याची भुकटी ( Black Idli Ingredients ) तयार केली. भुकटीचा वापर करत काळी इडली ( Charcoal Idli in Nagpur ) तयार केली.
सुरुवातीला ब्लॅक इडलीवर काहींचा आक्षेप
इडलीला पांढराशुभ्र रंगताच बघितलेले आहे. मात्र, ज्यावेळी रेड्डी यांनी काळी इडली तयार केली तेव्हा काहींनी यावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता त्याच लोकांना ही काळी इडली फारच आवडायला लागली आहे.
नवनवीन रुपात इडली सादर करण्यास तयार
अनेक जणांनी सप्तरंगी इडली तयार करण्याचे सुचवले आहे. याबाबत माहिती घेत असून इडलीला नवनवीन रुपात सादर करण्याची तयार असल्याचे कुमार रेड्डी यांनी सांगितले.
हे ही वाचा - Sukhwinder Singh in Nagpur : गाण्यातील आक्षेपार्ह आणि अश्लीलता वगळण्यासाठी सेन्सॉर बोर्डची गरज - सुखविंदर सिंग