नागपूर - भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या गाडीवर पश्चिम बंगाल येथे दगडफेक करण्यात आली. याचाच निषेध म्हणून नागपूरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. शहरातील कमाल चौकात हे आंदोलन करण्यात आले. शिवाय यावेळी पश्चिम बंगाल सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तृणमूल
काँग्रेसला येणाऱ्या निवडणुकीत भाजपाची भीती वाटत आहे, म्हणून असे हल्ले त्यांच्या पक्षाकडून करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
जे पी नड्डा यांच्यावर झालेली दगडफेक ही राजकीय हेतूने आहे. पश्चिम बंगाल मधे तृणमूल कॉग्रेसला भाजपाची भीती वाटत आहे. त्यामुळे ममता बँनर्जींच्या सरकारकडून असे कृत्य केले जात आहे. अशी टीकाही यावेळी बावनकुळे यांनी केली आहे.
तृणमूल काँग्रेस विरोधात घोषणाबाजी व पुतळ्याचे दहन-
या आंदोलनात तृणमूल काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनात पश्चिम बंगाल सरकारचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. त्यामुळे आंदोलन चांगलेचे तीव्र झाल्याचे पहायला मिळाले.
अशा घटना लोकशाहीला मारक -
ज्या प्रमाणे भारतभर भारतीय जनता पक्षाचा विजय होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल सरकार अक्षरशः हादरली आहे. म्हणूनच असे लोकशाहीला मारक कृत्य करत आहे. असेही बावनकुळे म्हणाले. येणाऱ्या काळात याचे परिणाम ममता सरकारला भोगावे लागणार आहे. त्यामुळे अशा कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असेही बावनकुळे म्हणाले.
प्रत्येक शहरात आंदोलन उभारणार -
लोकशाहीला मारक ठरणाऱ्या अशा हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण शहारात हे आंदोलन पुकारण्यात येत आहे. पुढेही हे आंदोलन असेच सुरू ठेण्यात येईल असेही बावनकुळे यांनी सांगितले. शिवाय येणाऱ्या काळात पश्चिम बंगालमधे भाजपाची सत्ता आणू. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. या आंदोलनात भाजयुमो बरोबरच भाजपाचे आजी - माजी पदाधिकारी व नेते प्रामुख्याने उपस्थित होते.