ETV Bharat / city

BJP Yuva Morcha: भुजबळांना सद्बुद्धी मिळो! भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

शाळेत सरस्वती देवीची पूजा का करायची असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. (BJP Yuva Morcha) छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात आज बुधवार (दि. 28 सप्टेंबर)रोजी नागपुरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सरस्वती पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला. दरम्यान, पोलिसांनी या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, भाजप युवा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांना सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थना सरस्वतीच्या फोटो पुढे केली आहे.

भाजप युवा मोर्चाचे आंदोलन
भाजप युवा मोर्चाचे आंदोलन
author img

By

Published : Sep 28, 2022, 4:16 PM IST

नागपूर - दोन दिवसांपूर्वी भुजबळांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना शाळेत होत असलेल्या सरस्वती पूजनाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. (Bhujbal gave a controversial statement ) सरस्वती देवीने आम्हाला शाळेत शिकवले नाही मग शाळेत सरस्वती पूजा का करायची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, त्यावरून हा वाद निर्माण झाला.

भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

शाळेत महापुरुषांचे फोटो लावा - शाळेत होणाऱ्या सरस्वती पूजे संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भुजबळ यांनी शाळेत देवी सरस्वती ऐवजी महात्मा ज्योतिबा फुले आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावावे अशी मागणी केली आहे.

भुजबळ यांना सद्बुद्धी मिळो - छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे ते हिंदू समाजाचे मन दुखवावे असे वक्तव्य करत आहेत. सरस्वती पूजन करण्यात आली आहे. आम्ही, या माध्यमातून सरस्वती मातेकडे प्रार्थना करण्यात करतो की भुजबळ यांना सद्बुद्धी मिळो अस कार्यकर्ते म्हणाले आहेत.

समता परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ

काय म्हणले होते भुजबळ - शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिले नाही. ज्यांनी कधी शिकवले नाही. असेलच शिकवले तर ते फक्त ३ टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.