ETV Bharat / city

State Wrestling Association : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत शरद पवारांना धक्का; भाजपचे खासदार रामदास तडस होणार अध्यक्ष

State Wrestling Association : नव्याने झालेल्या निवडणूक ( Wrestlers Council Election ) प्रक्रिया राबवत असताना बिनविरोध पार पडली असून अध्यक्षपदी भाजपचे खासदार रामदास तडस ( BJP MP Ramdas Tadas ) यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

अध्यक्षपदी भाजपचे खासदार रामदास तडस
अध्यक्षपदी भाजपचे खासदार रामदास तडस
author img

By

Published : Jul 27, 2022, 6:43 AM IST

Updated : Jul 27, 2022, 7:19 AM IST

नागपूर - मागील अनेक दशकांपासून कुस्तीगीर परिषदेचे ( Wrestlers Council ) अध्यक्ष राहिलेले शरद पवार ( Sharad Pawar ) यांना कुस्ती संघटनांमध्ये पुन्हा धक्का बसला आहे. त्यांच्या अध्यक्षपदी असताना भारतीय कुस्तीगीर संघाने ( Indian Wrestling Federation ) स्पर्धा घेत नसल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ( Maharashtra Wrestlers Parishad ) बरखास्त केली होती. यानंतर नव्याने झालेल्या निवडणूक ( Wrestlers Council Election ) प्रक्रिया राबवत असताना बिनविरोध पार पडली आहे. अध्यक्षपदी भाजपचे खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

अध्यक्षपदी भाजपचे खासदार रामदास तडस

अध्यक्षपदी असलेल्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे खासदार रामदास तडस ( BJP MP Ramdas Tadas ) हे स्वतः कुस्तीगीर आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची निवड प्रक्रिया 28 जुलैला होणार आहे. यात भविष्यात ऑलिम्पिक खेळाडू घडवायचे असल्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच हा एकप्रकारे शरद पवार यांना धक्का सुद्धा मानला जात आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतील वादामुळे बरखास्त - भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद हे भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांच्याकडे आहे. यातच आता भाजपचे खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यात शरद पवार हे मागील अनेक वर्षांपासून अध्यक्ष राहिले आहेत. यातच त्याचा कारभार सांभाळणारे बाबासाहेब लांडगे हे मागील 40 वर्षांपासून महाराष्ट्र्र कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदावर आहे. पण त्यांच्या कार्यकाळ हा वादग्रस्त राहिला आहे. अनेकदा इतर पदाधिकरी यांनी तक्रारी करून सुद्धा काहीच होत नसल्याने तसेच भारतीय कुस्तीगीर संघाने घ्यायला लावलेल्या स्पर्धाचे आयोजन होत नसल्याने कुस्तीगीर परिषदेचे काम ढेपाळले होते. तसेच अध्यक्ष असलेले शरद पवार हे लक्ष सुद्धा देऊ शकत नसल्याने परिणामतः भारतीय कुस्तीगीर संघाने करवाई करत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची बॉडी रद्द केली होती.

शरद पवार यांना एकप्रकारे धक्का - महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमध्ये नव्याने लागलेल्या निवडणुकीचा निकाल हा 31 जुलैला लागणार आहे. यासाठी 22 तारखेला नामांकन दाखल करण्यात आले होते. आज नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटची तारीख होती. मात्र, अध्यक्षपदासाठी नामांकन भरलेले 3 अर्जापैकी धावलसिंग मोहिते पाटील आणि काका पवार यांनी दोघांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे. यात अध्यक्षपद हे आपोआप भाजपचे खासदार तडस यांच्या पदरात पडले. पण हे होत असताना नक्कीच राजकीय खेळी झाली आहे. भविष्यातील नेतृत्व आणि राजाश्रय पाहता हे अध्यक्षपद खासदार तडस यांना देऊन सचिवपदी काका पवार तर कार्याध्यक्ष पद धवलसिंग मोहिते- पाटील यांना देण्यात आली. तसेच ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध करून घेण्यात अध्यक्ष असलेली तसेच विदर्भ केसरी राहिलेले खासदार तडस यांना यश आले आहे.

महाराष्ट्रातला कुस्तीगीर हा देशात ओळखला जायचा, तेच गत वैभव पुन्हा मिळून देण्याचा आवाहन आम्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी हे स्वीकारला असल्याचे नवनियुक्त महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तथा खासदार रामदास तडस यांनी बोलताना सांगितले आहे. यापूर्वी कधीही विदर्भाला अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाचा मान मिळाला नाही. मात्र, यावेळी सन्मान विदर्भाला मिळाला असताना विदर्भातून चांगले पैलवान घडवण्याचा ही प्रयत्न पुढील काळात केला जाणार असल्याचे अध्यक्ष रामदास तडस म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात कुस्ती वाढवण्यासाठी मिळून प्रयत्न करणार - महराष्ट्राच्या मातीतील कुस्ती वाढवण्यासाठी चांगले कुस्तीगीर पैलवान तयार करून, त्यांना ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मत नवनियुक्त सचिव काका पवार यांनी ईटीव्ही भारताला सांगितले आहे. तसेच कार्याध्यक्ष धवलसिंग मोहिते- पाटील यांनी शरद पवार यांना वयानुसार मोठा काळ काम केले असताना आता युवा पिढीला धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली. यात चांगले नेतृत्व हे अध्यक्ष म्हणून मिळाले असल्याचे यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा - Eknath Shinde vs Uddhav Thackeray: पालापाचोळ्यांनीचं इतिहास घडवला; एकनाथ शिंदेंचा पलटवार

हेही वाचा - Shinde-Thackeray Government Dispute : ठाकरे सरकारचे 400 जीआर वांद्यात, शिंदे सरकारचे नवे 538 जीआर, बदलले डझनभर निर्णय

हेही वाचा - Neelam Gorhe Interview : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत

Last Updated : Jul 27, 2022, 7:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.