नागपूर - झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणात झारखंड पोलिसांनी राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा खुलासा केल्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली. त्यानंर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत झारखंड सरकार पाडण्यासंदर्भात करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तर या प्रकरणी चौकशी होणार असल्याचे समोर येताच बावनकुळे यांनी १५ जुलै रोजी दिल्लीचा दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्या दरम्यान त्यांची झारखंड येथील आमदारांसोबत बैठक झाल्याचं बोलले जात आहे. या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, ते म्हणाले की होय मी दिल्लीला गेलो होतो. पण राजकीय कामासाठी नाही तर नवीन मंत्र्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलो होतो, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
झारखंड सरकार प्रकरण : होय मी दिल्लीला गेलो होतो, पण राजकीय कामासाठी नाही; बावनकुळे यांचा खुलासा - Former Maharashtra energy minister
या दौऱ्या दरम्यान त्यांची झारखंड येथील आमदारांसोबत बैठक झाल्याचं बोलले जात आहे. या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, ते म्हणाले की होय मी दिल्लीला गेलो होतो. पण राजकीय कामासाठी नाही तर नवीन मंत्र्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलो होतो, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.