नागपूर - भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी 1 रुपयाचा दावा केला ( Atul Londhe Petition Against Kirit Somaiya ) होता. तो दावा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणावर आता भाजपाची प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेले आरोप तथ्यहीन आणि बालिशपणाचे होते, अशी टीका भाजपाचे प्रदेश सचिव अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी ( Bjp Criticized Atul Londhe ) केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी २० नोव्हेंबर २०२१ रोजी किरीट सोमय्यांच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती. त्यात, किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी लोंढे यांनी केली होती. या संपूर्ण प्रकरणावर न्यायमूर्ती एस.एस.गवई यांनी लोंढे यांची तक्रार याचिका फेटाळून लावली. लोंढे यांनी केलेल्या तक्रारीतील आरोप स्पेसिफिक नसून संदिग्ध आहेत, असे न्यायालयाने म्हटलं. त्यामुळे तक्रार तत्थ्यहीन असल्याचा निर्वाळा दिला. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रवक्त्याचा बालिशपणा पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीका धर्मपाल मेश्राम यांनी केली.
काय आहे प्रकरण
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राज्य सरकारकडे वसुलीचा जो पैसा येतो, त्यातील ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेसला, ४० टक्के शिवसेनेला आणि २० टक्के हिस्सा काँग्रेसला मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याविरोधात अतुल लोंढे यांनी नागपुरच्या दिवाणी फौजदारी न्यायालयात 1 रुपयाचा दावा किरीट सोमय्यांवर दाखल केलेला.
हेही वाचा - Nagar Panchayat Election 2022 : 'आर्थिक बळावर जागा जिंकल्या...'; दीपक केसरकरांचा भाजपावर घणाघात