ETV Bharat / city

BJP blow to Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का, अमरावतीत पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेना पक्षात उभी फूट (split in ShivSena party) पडल्यानंतर राज्यात सत्तांतर घडलं. त्यानंतर अजूनही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला (uddhav thackeray) हादरे बसतचं आहेत. आज अमरावती येथील शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश वानखेडे (rajesh wankhede) यांच्यासह वीस प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश (shivsena workers join bjp) केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule) यांच्या उपस्थितीत नागपूर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात पक्ष प्रवेश संपन्न झाला. येत्या काळात मोठ्या प्रमाणात शिवसेनेसह अनेक पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा देखील बावनकुळे यांनी केलेला आहे. 2024 च्या निवडणुकीत शिवसेनेकडे उमेदवारचं शिल्लक राहणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

BJP blow to Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का, अमरावतीत पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
author img

By

Published : Sep 8, 2022, 11:08 PM IST

नागपूर शिवसेना पक्षात उभी फूट (split in ShivSena party) पडल्यानंतर राज्यात सत्तांतर घडलं. त्यानंतर अजूनही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला (uddhav thackeray) हादरे बसतचं आहेत. आज अमरावती येथील शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश वानखेडे (rajesh wankhede) यांच्यासह वीस प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश (shivsena workers join bjp) केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule) यांच्या उपस्थितीत नागपूर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात पक्ष प्रवेश संपन्न झाला. येत्या काळात मोठ्या प्रमाणात शिवसेनेसह अनेक पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा देखील बावनकुळे यांनी केलेला आहे. 2024 च्या निवडणुकीत शिवसेनेकडे उमेदवारचं शिल्लक राहणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अमरावती जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार जिल्ह्यातील पुर्ण शिवसेना आज भारतीय जनता पक्षात सहभागी झाली आहे. राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वात अपक्ष प्रवेश झाला आहे. राजेश वानखेडे हे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल 66 हजार मतं घेऊन प्रस्थापितांना घाम फोडला होता. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीने अमरावतीत भाजपने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे.

उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का, अमरावतीत पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडणार असा दावाही त्यांनी केलाय. एवढेच नाही तर सर्वजण आश्चर्यचकित होईल एवढे मोठे पक्ष प्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंवर राजेश वानखेडेंचे गंभीर आरोप 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. त्यापैकी एकाही पत्राच त्यांनी उत्तर दिलं नाही. एवढंच नाही तर अनेक वेळा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अडीच वर्षाच्या काळात त्यांची एकदाही भेट झाली नाही. उलट काँग्रेस सोबत जुळवून घ्या असाच सल्ला कार्यकर्त्यांना देण्यात आला. असा आरोप राजेश वानखेडे यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.