ETV Bharat / city

महाराष्ट्रात कृषी विधेयकाला दिलेल्या स्थगितीवरून भाजपचे नागपुरात आंदोलन - नागपूर भाजप आंदोलन बातमी

कृषी विधेयकाला महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने शासन निर्णय काढून स्थगिती दिली आहे. याचाच निषेध म्हणून भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सहकार विभागाने काढलेल्या शासन निर्णयाची होळीही करण्यात आली.

BJP agitation in Nagpur
भाजपचे नागपुरात आंदोलन
author img

By

Published : Oct 7, 2020, 5:02 PM IST

नागपूर - केंद्र सरकारकडून कृषी विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, महाराष्ट्र शासन या विधेयकाला स्थगिती देत आहे. याच मुद्यावरून नागपुरात भाजपकडून आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शासन मोघलशाही करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. शिवाय महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने काढलेल्या शासन निर्णयाची होळी यावेळी करण्यात आली. भाजप महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

भाजपचे नागपुरात आंदोलन

केंद्र सरकारकडून कृषी विधेयकासह अन्य दोन विधेयकाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर या विधेयकाला लागू करण्याचे निर्देशही देण्यात आले. मात्र, महाराष्ट्र शासनाकडून या विधेयकाला निरर्थक विरोध केला जात आहे. हे महाराष्ट्र शासन मोघलशाही शासन आहे. म्हणून या विधेयकाला विरोध करत आहे, असा आरोप भाजप महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

हेही वाचा - विद्या वेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी नागपुरातील आयुर्वेदिक निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

कृषी विधेयकाला महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने शासन निर्णय काढून स्थगिती दिली आहे. याचाच निषेध म्हणून भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सहकार विभागाने काढलेल्या शासन निर्णयाची होळीही करण्यात आली. शिवाय काँग्रेसकडून मुद्याम करून या विधेयकाला विरोध केला जात आहे. शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोपही यावेळी बावनकुळे यांनी केला. कृषी विधेयक हे शेतकरी हिताचेच आहे, असेही यावेळी बावनकुळे म्हणाले. त्यामुळे केंद्र सरकारकडून पारित करण्यात आलेले कृषी विधेयक संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात यावे, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. सोबतच महाराष्ट्र शासनाकडून या निर्णयांना स्थगिती दिल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी भूमिका घेऊ नका, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा - महाज्योती बचाव कृती समितीचे समाज कल्याण कार्यालया समोर 'ढोल वाजवा गोंधळ' आंदोलन

या सहकार विभागाच्या निर्णयाचा निषेध म्हणून कृषी बाजारपेठांसमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाने या निर्णयावरिल स्थगिती उठवली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला. यावेळी भाजप आमदार गिरीश व्यास यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.