ETV Bharat / city

नागपुरातील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा, मुख्यमंत्र्यांनी मागितली गडकरींची मदत - नागपूर अपडेट

उत्तर नागपूर महत्त्वाकांक्षी कडबी चौक ते गोळीबार चौकात १४६ कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे उड्डाण पुलाचे शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. महाराष्ट्र राज्य रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने ( महारेल ) आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री
author img

By

Published : Jul 31, 2021, 10:19 PM IST

नागपूर - महाराष्ट्रात नैसर्गिक संकटाने आलेल्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते आणि पूल खराब झाले आहे. पण आता नवे रस्ते बांधताना पुढच्या पिढ्यांसाठी टिकले पाहिजे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहायाने ते केले पाहिजे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीची गरज असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ते नागपुरात महारेलच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

नागपूरातील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा, मुख्यमंत्र्यांनी मागितली गडगरींची मदत

उत्तर नागपूर महत्त्वाकांक्षी कडबी चौक ते गोळीबार चौकात १४६ कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे उड्डाण पुलाचे शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. महाराष्ट्र राज्य रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने ( महारेल ) आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री विकास कुंभारे, राजू पारवे, कृष्णा खोपडे, मोहन मते, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल, जिल्हाधिकारी विमला आर.उपस्थित होते.

संबंध नॅरोगेज ऐवजी ब्रॉडगेज पद्धतीने वाढत राहील असेही ते म्हणाले
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक करत भाषणात सुरुवात केली. समृद्धी महामार्गामुळे राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर जवळ येत आहे. विकास कामात राजकीय अडथळे येऊ न देता विकास कामासाठी सोबत येऊ ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे संबंध नॅरोगेज ऐवजी नेहमी ब्रॉडगेज पद्धतीने वाढत राहील, असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणालेत.

प्रकल्पासाठी सर्व राजकीय पक्षांनी नेत्यानी सहकार्य केले
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी संबोधित करताना या प्रकल्पासाठी सर्व राजकीय पक्षांनी, नेत्यांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला. राज्याचे आजी-माजी ऊर्जामंत्री आणि ऊर्जा विभागाने यासाठी केलेली मदत केल्याचे ते म्हणाले. उत्तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करताना या ठिकाणचे अतिक्रमण अडचण ठरणार नाही, यासाठी स्थानिक नेत्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. नागपूर ते वडसा हा ब्रॉडगेज मार्ग पूर्णत्वास जाईल. सोबतच उमरेड पुढील भिवापूर पर्यंतच्या चार पदरी रस्ते मार्गामध्ये वने व पर्यावरण विभागाच्या आक्षेपांची पूर्तता झाल्यास हा रस्ता देखील पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. नव्या रेल्वे लाईनमुळे विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना कोळसा पुरवताना 20 ते 22 तास याठिकाणी लागायचे. त्या ठिकाणी केवळ दोन तासांमध्ये कोळशाची सुलभ वाहतूक होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

'विकास कामात परस्परांना सहकार्य करण्याची नागपूरची संस्कृती'

विकास कामात परस्परांना सहकार्य करण्याची नागपूरची संस्कृती असून नागपूरच्या मेट्रोला हिरवी झेंडी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये राज्याचे ऊर्जा मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे मंत्रालय यांनी समन्वयातून काम केल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी आमदार राजू पारवे यांनी घेतलेल्या पुढाकाराचा त्यांनी आवर्जुन उल्लेख पालकमंत्री नितीन राऊत यांनी केला.

हेही वाचा - अतिवृष्टीमुळे सुमारे १७ हजार कुटुंब बेघर; नुकसानभरपाईचा आकडा वाढण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.