ETV Bharat / city

भारत बंद : गरज भासल्यास दिल्लीकडे कूच करणार...नागपुरात शीख बांधवांची निदर्शने

author img

By

Published : Dec 8, 2020, 3:29 PM IST

शेतकरी आंदोलनाच्या समर्थानात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र नागपुरात त्याचा फारसा प्रभाव दिसून आलेला नाही. मात्र शीख समजाकडून नागपूर कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौकात जोरदार प्रदर्शन करण्यात आले.

sikh protest in nagpur
भारत बंद : नागपुरात शीख समाजाचे कृषी कायद्याविरोधात आंदोलन

नागपूर - शेतकरी आंदोलनाच्या समर्थानात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र नागपुरात त्याचा फारसा प्रभाव दिसून आलेला नाही. मात्र शीख समजाकडून नागपूर कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौकात जोरदार प्रदर्शन करण्यात आले. यावेळी शेकडो आंदोलकांनी कृषी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाह असल्याचा आरोप केला.

भारत बंद : गरज भासल्यास दिल्लीकडे कूच करणार...नागपुरात शीख बांधवांची निदर्शने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या काळात स्वतःच्या पक्षातील नेत्यांसह विरोधकांनाही विश्वासात न घेता तीन कृषी कायदे लागू केले. त्यानंतर पंजाबमधून विरोधाची मशाल प्रज्वलित झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पंजाब आणि हरयाणात कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. याचे लोण देशभरात पसरले असून देशातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. मागील 13 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानेच ही वेळ उद्भवल्याचे आंदोलकांनी सांगितले. केंद्राने हे कायदे परत न घेतल्यास भविष्यात या पेक्षाही मोठं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. ऑटोमोटिव्ह चौकात देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दंगा नियंत्रक पथकासह राज्य राखीव दलाचे पथक तैनात करण्यात आले होते.

आदेश मिळाल्यास दिल्लीकडे कूच करण्यास तयार

गेल्या 13 दिवसांपासून शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे एक प्रकारचे सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे. जगाचा पोषणकर्ता जगला पाहिजे, ही भावना प्रत्येक नागरिकाची आहे. दिल्लीच्या थंडीत सुरू असलेल्या आंदोलनाला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र गरज पडल्यास शेकडो ट्रॅक्टर्सने हजारो शीख बांधव दिल्लीकडे कूच करण्यासाठी तयार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.