नागपूर - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने भावनिक मुद्यासह प्रखर राष्ट्रवादासारख्या मुद्यांवर प्रचार केंद्रीत करून निवडणूक जिंकली. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे मुद्दे प्रभावी ठरत नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
स्थानिक विकासाचे राजकारण सोडून भाजपकडून याही निवडणुकीत भावनिक राजकारण सुरू आहे, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी खास बातचीत करून काँग्रेसच्या प्रचार मोहिमे विषयी माहिती जाणून घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत, ते पाहता देवेंद्र फडणवीस अजूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेतून बाहेर पडले नसल्याचा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावला.