ETV Bharat / city

Explosive Found In Nagpur : नागपूरच्या रेल्वे स्थानकावर स्फोटकांनी भरलेली बॅग सापडली.. पोलीस आयुक्त म्हणाले..

नागपूर येथील रेल्वे स्थानकावर ( Nagpur Railway Station ) स्फोटक असे ५४ डिटोनेटर्स असलेली बॅग संपल्याने खळबळ उडाली ( Explosive Found In Nagpur ) आहे. या स्फोटकांची तीव्रता कमी असली तरी ही बॅग नेमकी ठेवली कुणी याचा तपास करण्यात येत आहे.

Explosive Found In Nagpur
नागपूरमध्ये स्फोटकांनी भरलेली बॅग सापडली
author img

By

Published : May 10, 2022, 7:19 AM IST

Updated : May 10, 2022, 12:10 PM IST

नागपूर : नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पद वस्तू असलेली बॅग सापडली. बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली असत त्यामध्ये स्फोटक असे ५४ डिटोनेटर्स सापडले असल्याचे नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

नागपूर रेल्वे स्थानकावर संशयास्पद वस्तू असलेली बॅग सापडली आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) आणि बीडीडीएस (बॉम्ब शोध आणि निकामी पथके) तपास करत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे आरपीएफ अधिकारी आशुतोष पांडे यांनी दिले.

नागपूरच्या रेल्वे स्थानकावर स्फोटकांनी भरलेली बॅग सापडली.. पोलीस आयुक्त म्हणाले..

नागपूर शहरातील मुख्य रेल्वे स्थानक कंपाऊंड परिसरातून सुरक्षा पोलिसांनी एक बॅग जप्त जप्त केली आहे. बॅगमध्ये छोट्या आकाराच्या डिटोनेटर्स (जिवंत स्फोटके) आढळून आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेले डिटोनेटर्स खाण (मायनिंग) मध्ये ब्लास्ट करण्याच्या कामात येतात. बॅगमध्ये जिवंत स्फोटके असल्याचे निष्पन्न होताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. बीडीडीएस पथकाने स्फोटके भरलेली बॅग ताब्यात घेऊन ती सुरक्षित ठिकाणी हलवली आहे.

स्फोटके घातक नाहीत : काल रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर स्फोटके भरूलेली एक बॅग सापडली होती, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ते स्टोटके फार घातक नसल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. तपास अगदी प्राथमिक स्तरावर असल्याने फार माहिती देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. एका काळ्या रंगांच्या बॅगमध्ये 54 डिटोनेटर आढळून आली असली तरी, त्यांची क्षमता केवळ फटाक्यांएवढीच होती. त्या बॅगमध्ये जिलेटीन आढळून आले नसल्याचे देखील पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. स्फोटकांचा कोणत्याही दहशतवादी संघटना किव्हा नक्षलवादी संघटनांसोबत संबंध आढळून आला नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

  • Maharashtra | A bag containing suspicious items has been found at Nagpur railway station. Railway Protection Force (RPF) and BDDS (Bomb Detection and Disposal Squads) teams are investigating it: Ashutosh Pandey, RPF Official Central Railway, Nagpur pic.twitter.com/qMD0kCU1RC

    — ANI (@ANI) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा : पंजाब: मोहालीत इंटेलिजन्स ब्युरोच्या कार्यालयाबाहेर स्फोट

Last Updated : May 10, 2022, 12:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.