ETV Bharat / city

नागपूर पदवीधर निवडणुकीत अंदाजे ५५ % मतदान; ३ डिसेंबरला मतमोजणी

नागपूर पदवीधर निवडणुकीत अंदाजे ५५ % मतदान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार.

विधानपरिषद पदवीधर निवडणूक मतदान
विधानपरिषद पदवीधर निवडणूक मतदान
author img

By

Published : Dec 1, 2020, 10:08 PM IST

नागपूर - पदवीधर निवडणूक मतदान प्रक्रिया राज्यातील सर्वच जिल्ह्यात पार पडली आहे. यात नागपूर विभागाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार पदवीधर निवडणुकीत अंदाजे ५५% मतदान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी ही आकडेवारी रात्री उशीरापर्यत वाढू शकते. असेही संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे. या निवडणूकीचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहिर होणार असून विभागातील एकूण १९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात दोन दिग्गज नेत्यांमधे लढत-

सर्वच अंगाने महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पदवीधर निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया अखेर आज सायंकाळी समाप्त झाली आहे. त्यामुळे नागपूर विभागातील सगळ्याच उमेदवारांना आता निकालाची धाकधूक लागली आहे. विभागात एकूण २ लाख ६ हजार ४५४ इतकी अधिकृत मतदारांची संख्या आहे. यापैकी सर्वाधिक मतदारांची संख्या ही नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूर जिल्ह्यात दोन दिग्गज नेत्यांमधे लढत होत आहे. कॉंग्रेसकडून अभिजीत वंजारी तर भाजपाकडून संदिप जोशी हे उमेदवार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान कोणाला मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मतदान प्रक्रिया ही अत्यंत सुरळीत-

तसेच नागपूर विभागात सर्वात कमी मतदार हे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातही अपेक्षित मतदान झाल्याचे सांगण्यात आले आहे. मतदानाची अंतिम आकडेवारी रात्री उशीरा येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आकडेवारी वाढली तर निकालही अत्यंत चूरसीचे असणार आहेत. आज दिवसभरात नागपूर विभागात व जिल्ह्यात मतदान प्रक्रिया ही अत्यंत सुरळीत पार पडली.

३ डिसेंबर मतमोजणी-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देखील मतदान केंद्रावर विशेष खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासुन सुरू असलेली मतदान प्रक्रिया सुस्पष्टपणे पार पडली. अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तसेच ३ डिसेंबरला शहरातील मानकापूर स्टेडिअमवर सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात होईल. त्यामुळे विभागातील १९ उमेदवारांचे भवितव्य हे ३ डिसेंबर रोजी स्पष्ट होईल.

हेही वाचा- राज्यात ४ हजार ९३० नवीन कोरोना रुग्णांचे निदान, ९५ रुग्णांचा मृत्यू

हेही वाचा- DDC Elections : जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यात ४८.६२ टक्के मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.