नागपूर - नागपूर महानगरपालिकेची मुदत येत्या चार मार्च रोजी संपत ( Nagpur Municipal corporation election ) आहे. त्यामुळे 5 मार्चपासून नागपूर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून ( Appointment of Administrator on Nagpur corporation ) महापालिकेचे वर्तमान आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या नियुक्तीचे आदेश नगर विकास विभागाने गुरुवारी काढले आहेत.
विहित कालावधीमध्ये निवडणूक होणे शक्य नसल्यामुळे नागपूर महापालिकेवर प्रशासक म्हणून महानगर पालिकेचे आयुक्त यांची ( Commissioner B Radhakrushan as administrator ) नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका वेळेत घेणे शक्य होणार ( Nagpur corporation election update ) नसल्याचे म्हटले आहे. तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे.
हेही वाचा-Yashomati Thakur On Opposition : 'नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा विरोधकांना अधिकार नाही'
मनपा आयुक्तांकडे प्रशासक म्हणून ही असणार जबाबदारी-
भारतीय संविधानातील अनुच्छेद २४३U तसेच, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ६,६ (अ) मधील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची आहे. त्यामुळे ही मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी व विशेषतः कलम ४५२ अ च्या (१ अ) व (१ ब) मधील तरतुदी नुसार दिनांक 4 मार्च रोजी मुदत संपत असलेल्या नागपूर महानगरपालिका येथे प्रशासकपदी आयुक्त , नागपूर महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त , नागपूर महानगरपालिका यांनी महानगर पालिकेची विहीत मुदत संपताच प्रशासक म्हणून कार्यभार स्विकारावा तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी असे नगर विकास विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राधाकृष्णन बी २००८ च्या बॅचचे सनदी अधिकारी
राधाकृष्णन बी २००८ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. त्यांची पहिली नेमणूक जालना जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी आणि नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून देखील काम केलेले आहे. या शिवाय त्यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अध्यक्ष, मुंबई म्हाडाचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वी काम केलेले आहे.