ETV Bharat / city

अर्णब गोस्वामी चॅट लीकवरून अनिल देशमुखांचा केंद्राला सवाल - bjp

बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामींना तीन दिवस आधीच कशी मिळाली, याचे केंद्राने उत्तर देण्याची गरज असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

अर्णब गोस्वामी चॅट लीकवरून अनिल देशमुखांचा केंद्राला सवाल

author img

By

Published : Jan 23, 2021, 3:52 PM IST

Updated : Jan 23, 2021, 4:26 PM IST

नागपूर - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी चॅट लीक प्रकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामींना तीन दिवस आधीच कशी मिळाली, याचे केंद्राने उत्तर देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशाच्या अंतरिम सुरक्षेसंदर्भात पंतप्रधान, संरक्षण मंत्री यांच्यासह काही मोजक्या लोकांकडेच गोपनीय माहिती उपलब्ध असते. अशावेळी अर्णब गोस्वामी यांना ती माहिती कशी काय मिळाली यासंदर्भात केंद्रातील नेत्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.

अर्णब गोस्वामी चॅट लीकवरून अनिल देशमुखांचा केंद्राला सवाल
धनंजय मुंडे प्रकरण आता संपले आहेरेणू शर्माने राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेले बलात्काराचे आरोप मागे घेतले असून हे प्रकरण संपल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे. या महिलेचे शपथपत्रही त्यांनी पत्रकारांना दाखविले. यामध्ये त्या महिलेने स्पष्टपणे असे म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार करण्याकरिता काही राजकीय नेत्यांनी तिच्यावर दबाव आणला होता. केवळ धनंजय मुंडे यांची बदनामी करण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचण्यात आले होते. मात्र आता महिलेने आरोप मागे घेतल्याने हे प्रकरण संपल्याचे गृहमंत्री म्हणाले.पोलीस भरती; १२-हजार पोलिसांची भर्ती मराठा आरक्षणाचा प्रश्न अनुत्तरित असताना गृहमंत्रालयाने राज्यातील 12,000 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 5300 पदे भरली जातील तर उर्वरित पदे दुसऱ्या टप्प्यात भरली जाणार आहेत. मधल्या काळात मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रिया लांबली होती. त्यानंतर आम्ही मराठा समाजातील नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांना पोलीस भरती करणे गरजेचे असल्याचे पटवून दिले. त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केले आहे. त्यामुळे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.राज्याने कमी केलेली सुरक्षा केंद्राने का वाढवली?गेल्या आठवड्यात गृहमंत्रालयाने राज्यातील अनेक पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. यामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांचा सर्वाधिक समावेश आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि आणि नारायण राणे यांचीदेखील नावे आहेत. राज्य सरकारने या दोन नेत्यांची सुरक्षा कमी केल्यानंतर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवलेली आहे. सुरक्षेचा विषय हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असून केंद्राने यामध्ये हस्तक्षेप करायला नको होता. मात्र विशेष बाब म्हणून केंद्राने या दोन नेत्यांना सुरक्षा पुरवलेली आहे त्यावर आमचा काही आक्षेप नसल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.भंडारा जळीत कांड; फॉरेन्सिक अहवालानंतर कारवाईभंडारा येथील सर्वसामान्य रुग्णालयाच्या एनआयसीयू कक्षाला लागलेल्या आगीत १० निरागस बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल राज्य सरकारला प्राप्त होणार आहे. या अहवालात दोषी असल्याचा ठपका ज्यांच्यावर ठेवला जाईल त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहितीही अनिल देशमुख यांनी दिली आहे. मुंबईच्या डोंगरी परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा आढळून आल्यानंतर अनेक खुलासे होत आहेत. या अमली पदार्थांच्या माध्यमातून मिळालेले पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरले जात असल्याचा संशय आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करणार असल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - देशातील पहिले कारागृह पर्यटन महाराष्ट्रात, 26 जानेवारीपासून होणार सुरूवात

Last Updated : Jan 23, 2021, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.