नागपूर: नागपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना सर्वपक्षीय नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर क्रीडा साहित्य वाटपात घोटाळा ( Nagpur sports Equipment Distribution Scam ) केल्याचा आरोप झाले होते, त्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्तांनी चंद्रशेखर यांनी आरोपांची चौकशी करण्यासाठी नंदलाल चौकशी कमेटी गठीत केली होती. चौकशी कमिटीने दिलेल्या अहवालात 109 नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
तत्कालीन नगरसेवकांनी क्रीडा मंडळांना साहित्य देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका नंदलाल कमिटीने ( Nandlal Committee ) ठेवला, त्याआधारे आरोपींवर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुमारे 22 वर्ष सुरू होती. अखेर आज या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला आहे. ज्यामध्ये सर्व आरोपींना आरोप मुक्त करण्यात आले आहे.
अनेक नगरसेवकांचा मृत्यू - नंदलाल कमिटीने दिलेल्या अहवालाच्या आधारे सदर पोलिस ठाण्यात भाजपच्या तत्कालीन महापौर कल्पना पांडे, वसुंधरा मसूरकर यांच्यासह वर्तमान आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे यांच्यासह तब्बल 109 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात भाजपसह काँग्रेस,आरपीआय आणि काही अपक्ष नगरसेवकांचाही समावेश होता. मात्र आज या खटल्याचा निकाल आला तेव्हा 7 नगरसेवक आज हयात नाहीत.
त्यावेळी मनपात भाजप होती सत्ता - 2000 मध्ये नागपूर मनपात भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, तर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नगरविकास खात्याचे तत्कालीन सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.
हेही वाचा - Vehicle Burning Incidents : वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागण्याची शक्यता टाळण्यासाठी वाचा 'या' टिप्स