ETV Bharat / city

नागपुरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई; आतापर्यत ३८ लाख ६३ हजारांचा दंड वसूल - नागपूर महानगर पालिका ताज्या बातम्या

कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता, कोरोनाविरोधी उपाययोजनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, अनेक लोक याला हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. अशा बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.

विनामास्क
विनामास्क
author img

By

Published : Oct 10, 2020, 5:45 PM IST

नागपूर - कोरोनाचा वाढता धोका पाहता मास्क घालणे अनिर्वाय आहे. मात्र, अनेक नागरिक बेजबाबदारपणे विनामास्क फिरताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर महानगरपालिकेकडून कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात आतापर्यत ११ हजार ६ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील विविध चौकात ही कारवाई मनपाच्या पथकाकडून करण्यात येत आहे. शिवाय या कारवाईतून मनपाने आतापर्यंत ३८ लाख ६२ हजार इतका दंड वसूल केला आहे. त्याचबरोबर या आकडेवारीत दररोज भर पडत असल्याचे चित्र आहे.

वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, अनेक नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसून येत आहेत. रस्त्यांवर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांचे वाढते प्रमाण पाहता, नागपूर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून ही कारवाई मनपा प्रशासनाकडून सुरू आहे. यात दररोज २०० ते ३०० नागरिकांवर विनामास्कची कारवाई केली जात आहे. शिवाय प्रत्येकी ५०० रूपये इतका दंडही आकारला जात आहे. त्यामुळे दररोज ही कारवाई करून मनपा १ लाख रूपयांपेक्षा अधिक दंड वसूल करत आहे. शिवाय आत्तापर्यत विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या पाहता हा दंड तब्बल ३८ लाख ६३ हजार इतका आहे. शिवाय विनामास्क दुचाकीवर फिरणाऱ्यांवरही ही कारवाई केली जात आहे. नागपुरातील कोरोना रुग्णांचा आकडा मंदावला असला, तरी कोरोना संसर्ग अजूनही कायम आहे. त्यामुळे बेजबाबदारपणे रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांना मनपाकडून कारवाई करत दणका दिला जात आहे.

हेही वाचा - 'ही' कंपनी देशात ५.४८ लाख नोकऱ्या देण्याचे करणार नियोजन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.