ETV Bharat / city

नागपूर : स्वतःच्या मुलीवर अत्याचार व पुतण्यासोबत अनैसर्गिक कृत्य, आरोपीस अटक - लैंगिक अत्याचार बातमी

आरोपी संजय हा तृतीयपंथीचा वेशभूषा करून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पैसे मागतो. त्याचे वागणे विकृतासारखे असल्याने त्याच्या पत्नीने घर सोडले होते. एवढेच नाही तर संजयच्या विकृतीला कंटाळून त्याच्या भावाच्या बायकोनेसुद्धा घर सोडून इतरत्र राहण्यासाठी निवारा शोधला.

Nagpur crime
Nagpur crime
author img

By

Published : Sep 28, 2021, 7:25 PM IST

Updated : Sep 28, 2021, 7:37 PM IST

नागपूर - समाजात वावरताना तृतीयपंथी म्हणून भीक मागणाऱ्या एका विकृताने स्वतःच्याच ८ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. संजय असे या विकृत आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतःच्या भावाच्या सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची माहितीही पुढे आली आहे. या घटनेची हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी संजयला अटक केली आहे.

शेजाऱ्यांनाही होती माहिती

आरोपी संजय हा तृतीयपंथीचा वेशभूषा करून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पैसे मागतो. त्याचे वागणे विकृतासारखे असल्याने त्याच्या पत्नीने घर सोडले होते. एवढेच नाही तर संजयच्या विकृतीला कंटाळून त्याच्या भावाच्या बायकोनेसुद्धा घर सोडून इतरत्र राहण्यासाठी निवारा शोधला. त्यामुळे घरी संजय, त्याची मुलगी, एक भाऊ, त्याचा मुलगा आणि आई असे पाच सदस्य राहत होते. घरी कुणी नसताना आरोपी संजय या दोघांवर लैंगिक अत्याचार करत होता. या घटनेची माहिती शेजारच्यांना समजताच त्यांच्यात प्रचंड रोष निर्माण झाला. त्यानंतर या घटनेची तक्रार हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी संजयला अटक केली आहे.

वृद्ध आईने बघितला किळसवाणा प्रकार

घरी कुणीही नसल्याची संधी साधून आरोपी संजय हा स्वतःच्या मुलीवर आणि पुतण्यावर अत्याचार करत असल्याची बाब आरोपी संजयच्या आईच्या लक्षात आली. त्यांनी शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर दोन्ही चिमुकल्यांची सुटका करण्यात आली. शेजारच्यांच्या मदतीने वृद्ध महिलेने स्वतःच्याच मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Last Updated : Sep 28, 2021, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.