ETV Bharat / city

Thief Girl Arrested Nagpur : शिक्षणात 'डबल एम.ए' मात्र चोरीच्या क्षेत्रात तरुणीची 'पीएचडी', २२ गुन्हे उघडकीस

author img

By

Published : Jan 4, 2022, 4:07 PM IST

नागपूर पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणीला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली ( Thief Girl Arrested Nagpur ) आहे. डबल एम. ए. ( Double MA Education ) झालेली ही तरुणी चोऱ्या करण्यात एक्स्पर्ट असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले असून, आतापर्यंत तिने केलेले २२ गुन्हे उघडकीस आले ( 22 Crime Cases Uncovered ) आहेत.

नागपूर नागपूर
नागपूर

नागपूर - शिक्षणात डबल एम.ए पर्यतचे शिक्षण ( Double MA Education ) घेतल्यानंतर चोरीच्या क्षेत्रात पीएचडी ( PhD In Theft ) झालेल्या एका 27 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीला नागपूर शहरातील सीताबर्डी पोलिसांनी ( Thief Girl Arrested Nagpur ) रंगेहाथ अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणीला सीताबर्डी पोलिसांनी ( Sitabardi Police Station Nagpur ) एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. मात्र तपासानंतर या तरुणीवर 22 चोरीचे गुन्हे दाखल झाले ( 22 Crime Cases Uncovered ) आहे. पुढे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चोरी केलेले दागिने ( Theft Of Jewelry ) विकल्या आपण पकडले जाऊ याची कल्पना असल्याने तिने चोरीचे सर्व दागिने घरीच लपवून ठेवले होते,पोलिसांनी ते सर्व दागिने जप्त केले असून त्याची किंमत 16 लाख रुपायांपेक्षा जास्त आहे.

शिक्षणात 'डबल एम.ए' मात्र चोरीच्या क्षेत्रात तरुणीची 'पीएचडी', २२ गुन्हे उघडकीस

मौजमजा करण्यासाठी सुरुवातीला केल्या चोऱ्या

चोरीच्या क्षेत्रात पीएचडी झालेली ही तरुणी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. ती मूळची नागपूरची असल्याने तिला शहरातील सर्व बाजारपेठांची इत्यंभूत माहिती आहे. घरची आर्थिक परिस्थिती सधन असताना देखील तिला चोरीचे व्यसन जडले आहे. शिक्षण घेत असताना काही वर्षांपूर्वी तिने मौज मज्जा करण्याच्या उद्देशाने मुख्य बाजारपेठांमध्ये असलेल्या सराफा बाजारात चोरी करायला सुरुवात केली. हळूहळू तिचा आत्मविश्वास इतका वाढला की दुकानात सर्वांच्या डोळ्यासमोर ती बिनधास्तपणे चोरी करायची. मात्र, कुणालाही थांगपत्ता सुद्धा लागायचा नाही.

एकाच पद्धतीने चोऱ्या करायची

पोलिसांनी अटक केलेली तरुणी एकाच पध्दतीने चोऱ्या करायची. एकाच प्रकारच्या चोऱ्या अनेक ठिकाणी होऊ लागल्याने नागपूर शहरातील अनेक पोलीस ठाण्याचे कर्मचारी तिच्या मागावर होते. मात्र, तीचा वावर इतका सहज होता की कुणालाही तिच्यावर सहजासहजी संशय येत नव्हता. याचाच गैरफायदा घेऊन चोऱ्यांचा सपाटा लावला होता.

अखेर तरुणी अडकली पोलिसांच्या जाळ्यात

म्हणतात ना गुन्हेगार कधी ना कधी कोणता ना कोणता पुरावा मागे सोडतोच, अखेर तोच पुरावा पोलिसांच्या हाती लागला आणि पोलिसांनी तिला चोरी करताना रंगेहात अटक केली. बघता बघता या तरुणीवर २२ चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तरुणीला काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर चोरीच्या गुन्ह्यांची यादी वाढतचं असल्याने पोलीस देखील हैराण झाले आहेत. पोलिसांनी आरोपी तरुणीच्या घरातून 16 लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने जप्त केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.