ETV Bharat / city

रेमडेसिवीरच्या काळ्या बाजाराचा कळस! एकाने चोरलेल्या इंजेक्शनवर दुसऱ्याचा डल्ला! - रेमडेसिवीरचा काळ्या बाजार

एका वॉर्ड बॉयने रुग्णालयातून चोरलेले रेमडेसिवीर इंजेक्शन त्याच्याच खोलीत राहणाऱ्या दुसऱ्या वॉर्डबॉयने चोरून 35 हजारांत विकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. रेमडेसिवीरची चढ्या दराने विक्री करताना हा वॉर्ड बॉय पोलिसांच्या जाळ्यात अडकला. यानंतर या घटनेचा खुलासा झाला.

रेमडेसिवीरच्या काळ्या बाजाराचा कळस! एकाने चोरलेल्या इंजेक्शनवर दुसऱ्याचा डल्ला!

author img

By

Published : May 7, 2021, 9:11 AM IST

नागपूर : कोरोना संकटात अत्याधिक महत्व प्राप्त झालेल्या रेमडेसिवीरच्या काळ्या बाजाराचा कळस गाठल्याचा प्रकार नागपुरातून समोर आला आहे. एका वॉर्ड बॉयने रुग्णालयातून चोरलेले रेमडेसिवीर इंजेक्शन त्याच्याच खोलीत राहणाऱ्या दुसऱ्या वॉर्डबॉयने चोरून 35 हजारांत विकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. रेमडेसिवीरची चढ्या दराने विक्री करताना हा वॉर्ड बॉय पोलिसांच्या जाळ्यात अडकला. यानंतर या घटनेचा खुलासा झाला.

पोलिसांनी याची सविस्तर माहिती दिली

चोरीच्या खुलाशाने पोलीसही चक्रावले

याविषयी सविस्तर माहिती अशी की, नागपुरात २२ एप्रिल रोजी सीताबर्डी पोलिसांनी खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका वॉर्ड बॉयसह तिघांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना अटक केली होती. त्या आरोपींची चौकशी सुरू असताना त्यांनी इंजेक्शन कुठून मिळवली या संदर्भात खुलासा केल्यानंतर पोलिसांनी चौथ्या आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याने केलेल्या धक्कादायक खुलाशाने पोलिसांचं डोकंही चक्रावून गेलं आहे. नागपुरातील जामठी परिसरातील 'कोविडालय' या रुग्णालयातून दिनेश गायवकवाड नावाच्या वॉर्ड बॉयने आयसीयूमधील रुग्णासाठीच्या रेमडेसिवीर इंजेक्शनपैकी दोन इंजेक्शन स्वतःकडे ठेवून घेतले होते. हे इंजेक्शन त्याने नंतर आपल्या खोलीवर आणले. त्याच्यासोबत या खोलीत दुसऱ्या रुग्णालयातील वॉर्डबॉय शुभम पानतावणे राहत होता. शुभमने हे इंजेक्शन दिनेशच्या अलमारीतून चोरले. त्यानंतर शुभमने प्रणय येरपुडे आणि मनमोहन मदन नावाच्या मित्रांच्या मदतीने हे इंजेक्शन 35 हजारांत विकण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

शुभमच्या चौकशीतून खुलासा

पोलिसांनी शुभमची कसून चौकशी केली असता त्याने हे इंजेक्शन दिनेश गायकवाडच्या अलमारी मधून चोरल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी दिनेश गायकवाडला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे इंजेक्शन कोविडालय या रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एका अत्यवस्थ रुग्णासाठीचे असून त्याला रेमडेसिवीरऐवजी ऍसिडिटीचे इंजेक्शन दिल्याची कबुली दिनेश गायकवाडने दिली. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णासाठी रुग्णालय प्रशासनाने तीन रेमडेसिविर इंजेक्शन दिले होते. मात्र, दिनेशने यापैकी दोन रेमडेसिविर इंजेक्शन आपल्याकडे ठेवून घेतले होते. तसेच सदरील रुग्णाला ऍसिडिटीचे इंजेक्शन टोचून दिले. याशिवाय रुग्णालयातील रेकॉर्डवर संबंधित रुग्णाला विशिष्ट कालावधीत तीन रेमडेसिविर इंजेक्शन लावल्याची नोंदही त्याने केली होती. त्यामुळे कोरोना काळात अशा प्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचाही धक्कादायक खुलासा यातून झाला आहे.

महिला डॉक्टरला अटक
पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दिनेश गायकवाड, शुभम पानतावणे, प्रणय येरपुडे, मनमोहन मदन या चार आरोपींसह एका महिला डॉक्टरलाही अटक केली आहे. ही महिला डॉक्टर एका तिसऱ्या रुग्णालयाची असून ती हे इंजेक्शन पुढे काळाबाजारी करुन विकण्यामध्ये मदत करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

ऍसिडिटीचे इंजेक्शन लावलेला रुग्ण एकदम ठणठणीत
आरोपी दिनेश गायकवाड याने कोविडालय या रुग्णालयातील आयसीयूमध्ये अत्यवस्थ असलेला ज्या रुग्णाला रेमडेसिवीरऐवजी ऍसिडिटीचे इंजेक्शन लावले होते, त्या अत्यवस्थ कोरोना बाधित रुग्णाची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. सध्या तो कोरोना मुक्त होऊन घरी ठणठणीत असल्याची माहिती समोर येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.