ETV Bharat / city

Nagapur Murder News : संपत्तीच्या वादातून मोठ्या भावाने केली लहान बहिणीची हत्या - उज्वला भोजन हत्या

कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथे संपत्तीच्या वादातून ( Murder over property dispute at Mohpa ) मोठ्या भावाने लहान बहिणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना लहान बहिण माहेरी आली होती, तेव्हा घडली आहे. आरोपी भावाला पोलिसंनी अटक केली आहे.

Mohpa
मोहपा
author img

By

Published : Jan 4, 2022, 4:28 PM IST

नागपूर : संपत्तीच्या वादातून ( Sister murdered over property dispute ) मोठ्या भावाने लहान बहिणीची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उज्वला अर्पित भोजन असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्याच्या मोहपा ( Incidents of Kalmeshwar taluka ) येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपी शरद गणोरकर याला अटक ( Accused Sharad Ganorkar arrested ) केली आहे. संपत्तीच्या कारणाने भाऊ बहिणीच्या नात्याचा अश्या प्रकारे अंत झाला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उज्वला भोजन ही काही दिवसांसाठी माहेरी आली होती. उज्वला माहेरी आल्यानंतर सुरुवातीचे दोन दिवस फार आनंदात गेले. त्यानंतर अचानक वडिलोपार्जित संपत्तीचा वाद ( Ujwala Bhojan Murder ) उफाळून आला. संपत्तीच्या वाटणीवरून उज्वला आणि तिचा मोठा भाऊ शरद यांच्यात वादविवाद सुरू झाला. त्यानंतर बघता-बघता वाद इतका विकोपाला गेला की, शरद हा उज्वला लग्नाआधी आईला कधीही मदत करत नसल्याचे टोमणे देत होता. या दरम्यान उज्वलाने शरदला विटेचा एक तुकडा फेकून मारला. त्यामुळे चिडलेल्या शरदला राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात बांबूने बहिणीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. ज्यामुळे उज्वला गंभीर जखमी झाली. त्यानंतर जखमी अवस्थेत तिला सावनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

घटनेच्या वेळी उज्वलाचा नवरा तिथेच होता -

संपत्तीच्या कारणावरून बहीण उज्वला आणि भाऊ शरद यांच्यात वादावादी सुरू होता. तेव्हा उज्वलाचा पती हा देखील तिथे उपस्थित होता. मात्र दोघा बहीण भावांमधील वाद कुणाचा जीव घेण्यापर्यंत जाईल, याची पुसटशी कल्पना देखील त्याला नव्हती. त्यामुळे तो या वादापासून दूर होता. परंतु त्याची ही बेफिकरी उज्वलाच्या जीवावर बेतली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.