ETV Bharat / city

Vidhan Parishad Election 2021 : नागपूर विधान परिषद निवडणुकीत 98 टक्के मतदान, आता प्रतीक्षा निकालाची

author img

By

Published : Dec 10, 2021, 8:22 PM IST

निवडणुकीत एकूण 560 मतदार होते. त्यापैकी 554 (98.92 टक्के) मतदारांनी मतदान ( 98 % Voters Cast Ballots ) केले. या निवडणुकीत एकूण तीन उमेदवार ( Three Candidates In Election ) रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. 14 डिसेंबरला बचत भवन येथे ( Counting on 14 December ) मतमोजणी होणार आहे.

मतदान केंद्राबाहेरील फोटो
मतदान केंद्राबाहेरील फोटो

नागपूर - विधान परिषदेच्या ( Vidhan Parishad Election Nagpur ) नागपूर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण 560 मतदार होते. त्यापैकी 554 (98.92 टक्के) मतदारांनी मतदान ( 98 % Voters Cast Ballots ) केले. या निवडणुकीत एकूण तीन उमेदवार ( Three Candidates In Election ) रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. 14 डिसेंबरला बचत भवन येथे ( Counting on 14 December ) मतमोजणी होणार आहे.

भाजपाकडून उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. रवींद्र भोयर आणि अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधान परिषदेची ही निवडणूक थेट भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस यांच्यात होत असली तरी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचे महत्त्व काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारापेक्षा जास्त वाढलेले आहे. मतदानाला केवळ १२ तास शिल्लक असताना काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार बदलल्यामुळे काँग्रेस नगरसेवकांमध्ये गोंधळाची स्थिती होती. त्यामुळे काँग्रेसचा नेमका उमेदवार कोण? याबाबत काँग्रेस नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे निकाल कुणाच्या बाजूने लागेल याबद्दल नागपूरकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

१४ ला मतमोजणी -

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. रात्री उशिरापर्यंत बचत भवनातील स्ट्राँग रूममध्ये मतपेट्या जमा करण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी पुढील चार दिवस तगडा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. 14 डिसेंबरला सकाळी 8 वाजता 4 टेबलवर मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल येणे अपेक्षित आहे.

हेही वाचा - Legislative Council Election : नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत भाजपचे नगरसेवक मतदान केंद्रात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.