ETV Bharat / city

चॉकलेट समजून खाल्ले उंदीर मारण्याचे औषध; नागपुरात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू - अजनी पोलीस ठाणे

सिहिरिया यांच्या घरात उंदरांचा सुळसुळाट वाढत होता. त्यामुळे गुंजनच्या आईने घरात जागोजागी उंदीर मारण्याचे औषध ठेवले होते. गुंजन बाहुली सोबत खेळत असताना औषध तिच्या नजरेस पडले. औषध वडीच्या स्वरूपात असल्याने ते चॉकलेट असावे असा गुंजनचा समज झाल्याने तिने उंदीर मारण्याचे औषध तिने खाल्ले.

Ajni Police Thane
Ajni Police Thane
author img

By

Published : Apr 24, 2022, 11:25 AM IST

नागपूर - चार वर्षांच्या एका चिमुकलीने तिच्या बाहुली सोबत खेळत असताना उंदीर मारण्याचे औषध नकळत खाल्ल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाड्याच्या जय गुरुदेव नगरात घडली आहे. गुंजन निलेश सिहिरिया (वय ४) असे दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे.

चॉकलेट समजून खाल्ले औषध - सिहिरिया यांच्या घरात उंदरांचा सुळसुळाट वाढत होता. त्यामुळे गुंजनच्या आईने घरात जागोजागी उंदीर मारण्याचे औषध ठेवले होते. गुंजन बाहुली सोबत खेळत असताना औषध तिच्या नजरेस पडले. औषध वडीच्या स्वरूपात असल्याने ते चॉकलेट असावे असा गुंजनचा समज झाल्याने तिने उंदीर मारण्याचे औषध तिने खाल्ले,त्यानंतर मात्र गुंजनला अस्वस्थ वाटू लागले होते. त्याचवेळी तिने उलटी देखील केली. तेव्हा तिच्या आईने गुंजनला जवळ घेऊन विचारपूस केली तेव्हा तिने उंदीर मारण्याचे औषध खाल्लं असल्याचं सांगितले. हे ऐकून गुंजनच्या आई,वडीलांच्या पायाखालची वाळूचा सरकली. त्यांनी लगेच मेडिकल रुग्णालयात धाव घेतली. मात्र काही वेळातच गुंजनचा दुर्दैवी मृत्यू झाला.

परिसरात शोककळा - हसत खेळत असणाऱ्या गुंजनच्या बाबतीत घडलेली अनपेक्षित घटना एकूण संपूर्ण जय गुरुदेव नगरात शोककळा पसरली आहे. शेजारचे नागरिक गुंजनच्या आई, वडिलांचे सांत्वन करत असले तरी काळीजाचा तुकडा हिरावल्याने ते सुन्न झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.